लाखनी येथे महागाईविरोधात धरणे आंदोलन
By Admin | Updated: July 1, 2014 23:20 IST2014-07-01T23:20:05+5:302014-07-01T23:20:05+5:30
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आर.पी.आय. व मित्रपक्षातर्फे केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या रेल्वेभाववाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात स्थानिक तहसील कार्यालयासमोर

लाखनी येथे महागाईविरोधात धरणे आंदोलन
लाखनी : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आर.पी.आय. व मित्रपक्षातर्फे केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या रेल्वेभाववाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात स्थानिक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
धरणे आंदोलनाचे नेतृत्व मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राकाँ जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विलास वाघाये, डॉ. गभणे, रामकृष्ण कापसे, अर्बन बँक संचालक पप्पू गिऱ्हेपुंजे, दामाजी खंडाईत, विनोद भुते, जि.प. सदस्य विजय खोब्रागडे, हेमराज कापसे, सुहास बोरकर, सुरेश गायधनी, दीपक निंबेकर, रणबीर भगत, सचिन उके, सरपंच उर्मिला आगाशे, अश्विनी भिवगडे, अनिता फटे, विशाल तिरपुडे, जितेंद्र भदाडे, विकास वासनिक यांनी केले. याप्रसंगी भाजपा सरकारने केलेल्या महागाई विरोधात संतप्त प्रतिक्रिया वक्त्यांनी व्यक्त केली. तहसीलदार समर्थ यांना महागाईविरोधात निवेदन देऊन धरणे आंदोलनाची सांगता केली. (तालुका प्रतिनिधी)