लाखांदूर येथील जवानाचा अरूणाचल राज्यात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:59 IST2018-08-27T22:59:30+5:302018-08-27T22:59:46+5:30

येथील जवान संतोष विठ्ठल बेदरे (३८) यांचा अरूणाचल प्रदेशातील टिपागड येथे सेवा बजावत असताना मलेरिया या आजाराने मृत्यू झाला. रविवारी दुपारी मोबाईलवरून त्यांच्या कुटुंबियांना ही बातमी समजताच शोककळा पसरली. बेदरे यांचे जन्म गाव लाखांदुर असून सध्या त्यांचे कुटुंबिय येथे वास्तव्यास आहे.

Lakhandur's Javana dies in Arunachal Pradesh | लाखांदूर येथील जवानाचा अरूणाचल राज्यात मृत्यू

लाखांदूर येथील जवानाचा अरूणाचल राज्यात मृत्यू

लाखांदुर : येथील जवान संतोष विठ्ठल बेदरे (३८) यांचा अरूणाचल प्रदेशातील टिपागड येथे सेवा बजावत असताना मलेरिया या आजाराने मृत्यू झाला. रविवारी दुपारी मोबाईलवरून त्यांच्या कुटुंबियांना ही बातमी समजताच शोककळा पसरली. बेदरे यांचे जन्म गाव लाखांदुर असून सध्या त्यांचे कुटुंबिय येथे वास्तव्यास आहे.
बेदरे हे २००१ मध्ये भारतीय भूदल सेनेत भरती झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कालावधी अवघा तिन महिने राहिला होता. त्यांनी आसाम, बिहार, जम्मू या ठिकाणी सेवा बजावली आहे.अरूणाचल प्रदेशातील टिपागड येथे मेजर या पदावर कार्यरत होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव लाखांदुरला आणण्यात येईल. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Web Title: Lakhandur's Javana dies in Arunachal Pradesh