पाणी साठवण क्षमता असलेला लाखांदूर तालुका कोरडा
By Admin | Updated: February 29, 2016 00:18 IST2016-02-29T00:18:25+5:302016-02-29T00:18:25+5:30
तालुक्यात सिंचनाची साधने पुरेपूर असली तरी पाणी अडवून पाणी साठवण क्षमता भक्कम करण्यासाठी सर्व यंत्रणेने करोडोच्या घरात निधी खर्च केला.

पाणी साठवण क्षमता असलेला लाखांदूर तालुका कोरडा
निधी खर्च : उन्हाळ्यात निर्माण होईल पाण्याची टंचाई
लाखांदूर : तालुक्यात सिंचनाची साधने पुरेपूर असली तरी पाणी अडवून पाणी साठवण क्षमता भक्कम करण्यासाठी सर्व यंत्रणेने करोडोच्या घरात निधी खर्च केला. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी साठवण क्षमता असलेले सर्व साधनात आज थेंब पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना भिषण पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.
पाणी अडवा, पाणी जिरवा हे म्हणणे सोपे आहे. जितकेच प्रशासनाचा अधिकाऱ्यांना व यंत्रणेनी पाण्याची तीव्र टंचाई भासवून अपयश पदरी पाडले आहे. तालुक्यातील सर्वच यंत्रणेचा माध्यमातून शेततळे सिमेंट नाला बांधकाम, बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.
वनविभागाच्यावतीने मागील तीन वर्षापासून लाखो रुपयाची वनतलाव, बंधारे बांधण्यात झाली. पाणी अडवून गिरविणे हा मुख्य उद्योग असला तरी वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी व पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, मात्र लाखो रुपये खर्च करूनही उन्हाळ्यात तर थेंब न थेंब पाण्याचा ठणठणाट असतोच. पावसाळ्यात पाणी अडविल्या जात नाही. त्यामुळे हे वनतलाव निरर्थक ठरले आहेत. तालुका कृषी कार्यालयामार्फत मागणीनुसार शेतकऱ्यांना शेती व्यवसायाला सिंचनाचा आधार व्हावा म्हणून शेततळे बांधण्यात आले. नाही तर अर्धवट बांधकाम झालेल्या शेततळ्यांची संख्या जास्त दिसून येते. याकरिता सुद्धा शासनाचा लाखोचा निधी खर्च करण्यात आला. तर अनेक शेतकऱ्यांना खर्च केलेली रक्कम अर्धवट बांधकामामुळे अडून आहे. सद्यस्थितीत बहुतांश शेततळे कोरडे आहेत. त्यामुळे पाण्याची पानही वाढणे गरजेचे असतानी या अनेक कारणामुळे खोलवर गेलेली आहे. निधी खर्च मात्र शेततळ्यात पाण्याचा ठणठणाट म्हटल्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरला नाही.
जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात विक्रमी सिमेंट नाला बांधकाम हाती घेण्यात आले. यासाठी कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आला. ही योजना शेतकऱ्यांना वरदान ठरणारी आहे. पाणी अडवून त्या पाण्याचा वापर सिंचनाकरिता व्हावा हा त्यामागचा मुख्य उद्देश फोल ठरला आहे.
निकृष्ट बांधकामामुळे पाणी अडवता आले नाही. बंधाऱ्यांना भगदाड असल्याने पाणी सरळ वाहून गेले. अन् बांधारे कोरडे राहिले. चालू वर्षातील संपूर्ण बंधारे, वनतलाव, शेततळ्यांची चौकशी केल्यास कोट्यावधीची निधी, पाणी साठवण साधनासाठी व्यर्थ गेल्याचा निष्कर्ष घरी लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे यंदा पाण्याची तीव्र टंचाई नक्कीच जाणवणार असून आतापासून तालुक्यातील अनेक गावातील नळयोजना बंद पडल्या आहे. (तालुका प्रतिनिधी)