रणरणत्या उन्हातही लाखांदूर पोलीस कर्तव्यदक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:01 IST2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:01:12+5:30
लाखांदूर तालुका तीन जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत. तरी या तालुक्याचे नाकेबंदी करणे मोठे आव्हान ठरते ते यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी सध्या आपले कौटुंबिक सुख बाजूला ठेवून यावेळी फक्त राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याला महत्व दिले आहे. काही पोलीस कर्मचारी आपल्या अनेक व्यक्तिगत समस्या पासून त्रस्त आहेत.

रणरणत्या उन्हातही लाखांदूर पोलीस कर्तव्यदक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : कोरोनावर मात करण्यासाठी देशात युद्ध पातळीवर संघर्ष सुरू आहे. या महायुद्धात वैद्यकीय कर्मचारी लढा देत आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी दिवस रात्र पहारा देत आहेत. लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास २० कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी सतत नाकाबंदी करीत आहेत. रणरणत्या उन्हातही आपल्या कर्तव्यापासून तिळमात्र ही विचलित होतानाही दिसत नाही. त्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे संपूर्ण लाखांदूर तालुक्यात ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात यश मिळत आहे.
लाखांदूर तालुका तीन जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत. तरी या तालुक्याचे नाकेबंदी करणे मोठे आव्हान ठरते ते यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी सध्या आपले कौटुंबिक सुख बाजूला ठेवून यावेळी फक्त राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याला महत्व दिले आहे. काही पोलीस कर्मचारी आपल्या अनेक व्यक्तिगत समस्या पासून त्रस्त आहेत. परंतु कर्तव्यासमोर त्यांच्या व्यक्तीगत समस्या पासून गौण झालेले आहेत. लॉकडाउन सुरु झाल्या पासून अनेक पोलीस शिपाई आपल्या कुटुंबाला भेटायला जाऊ शकले नाही. अशा प्रकारे कर्तव्य बजावत आहेत.
कौटुंबिक समस्या किंवा व्यक्तिगत समस्या असल्यातरी कर्तव्यदक्ष जो आनंद मिळतो तो फार वेगळा असतो.
-नितीन साठवणे, वाहतूक पोलीस