लाडाची सून ज्योती, तर चंद्रमाला ठरली आईतुल्य सासू
By Admin | Updated: July 1, 2014 01:20 IST2014-07-01T01:20:33+5:302014-07-01T01:20:33+5:30
लोकमत सखी मंच भंडारातर्फे सासु-सून संमेलन अंतर्गत सून माझी लाडाची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रथम क्रमांकाची लाडाची सून ज्योती तर चंद्रमाला गांधी ठरली आईतुल्य सासू.

लाडाची सून ज्योती, तर चंद्रमाला ठरली आईतुल्य सासू
भंडारा : लोकमत सखी मंच भंडारातर्फे सासु-सून संमेलन अंतर्गत सून माझी लाडाची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रथम क्रमांकाची लाडाची सून ज्योती तर चंद्रमाला गांधी ठरली आईतुल्य सासू. जिल्हाभरातून सखी स्पर्धक व सदस्यांनी कार्यक्रमात उदंड सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन उदापुरे ज्वेलर्सचे संचालक आकाश उदापुरे यांनी केले. यावेळी मंचावर एस.बी. डिजिटल बॅनरचे संचालक सोनल भरणे, लोकेश गेडाम व संध्या किरोलीकर उपस्थित होते. सरस्वती स्तुती गाण सपना गोस्वामी यांनी गायले. सून माझ्या लाडाची कार्यक्रमात सखी इतक्या भावूक झाल्या की स्पर्धकांनी आपल्या भावना प्रकट करताच उपस्थितांचे डोळे साहजिकच पानावले. कुणाला तर काही शब्दच सुचेना. परंतु शब्दांचा अर्थ मात्र त्यांच्या अश्रूंनी पूर्ण केला.
स्पर्धेमध्ये चंद्रमाला व ज्योती गांधी या सासू-सुनेच्या जोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक मंगला व पूनम डहाके तृतीय क्रमांकाकरिता राधिका व विशाखा जिभकाटे चतुर्थ यशोदा व मीना खोत तर श्यामल व उर्मिला दलाल यांना पाचव्या क्रमांकासाठी निवडण्यात आले.
प्रोत्साहनपर बक्षीस ललिता व प्रतिभा रंभाड आणि गयाबाई व विजया बांडेबुचे यांच्या जोडीने प्राप्त केले. स्पर्धेचे परीक्षण संध्या किलोरीकर व दुर्गा डोरले यांनी केले. कार्यक्रमात मेघा पराते, हेमलता मासूरकर, सुनंदा तईकर, किरण बारापात्रे, वंदना गुरूमुखी, पुष्पा नंदेश्वर, नीतू डेकाटे, वैशाली पडोळे, स्मिता साठवणे, संध्या हलमारे व प्रतिभा चिरवतकर यांनी नृत्य सादर करून रंगत आणली. दिग्दर्शन पूनम रहिले यांनी केले.
संचालन जिल्हा संयोजक बाल विकास मंच ललित घाटबांधे व आभार सखी मंचच्या जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी मानले. युवा नेक्स्ट सखी मंच व बालविकास मंच यांच्या कार्यक्रमाची वार्षिक यादी युवा नेक्स्ट संयोजिका ग्रीष्मा खोत यांनी प्रेक्षकांसमोर सादर केली. वार्ड संयोजिका चंदा मुरकुटे यांनी आपल्या रेखीव रांगोळीने सर्व आमंत्रितांचे स्वागत केले. माधव तिघरे व राजेश पराते यांनी कार्यक्रम नियोजनात सहकार्य केले. वार्ड संयोजिका सुहासिनी अल्लडवार, राखी सूर, कल्पना डांगरे, मेघा नारायणपुरे, मनीषा रक्षिये, भावसागर, लतिशा खोत व स्रेहा वरखडे यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)