पुनर्वसित गावात सुविधांचा अभाव
By Admin | Updated: July 23, 2014 23:28 IST2014-07-23T23:28:09+5:302014-07-23T23:28:09+5:30
गोसीखर्दु प्रकल्पात गेलेल्या तालुक्यातील खमाटा व टाकळी या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र शासनाने पुनर्वसित गावात सोयी सुविधा पुरविले नसल्याने येथील नागरिकांचे आरोग्य, शिक्षण धोक्यात आले

पुनर्वसित गावात सुविधांचा अभाव
भंडारा : गोसीखर्दु प्रकल्पात गेलेल्या तालुक्यातील खमाटा व टाकळी या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र शासनाने पुनर्वसित गावात सोयी सुविधा पुरविले नसल्याने येथील नागरिकांचे आरोग्य, शिक्षण धोक्यात आले असून नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा व्हावी याकरीता गोसीखुर्द प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यात खमाटा व टाकळी या गावांचेही लावेश्वर मोड ते कोथुर्णा मार्गावर चार वर्षापुर्वी केले. मागील चार वर्षापासून पुनर्वसीत ठिकाणी या गावचे नागरिक वास्तव्य करीत आहे. मात्र शासनाकडून त्यांना देण्यात आलेल्या सोयी सुविधांच्या आश्वासनाची अजुनही पुर्तता करण्यात आलेली नाही. केवळ आश्वासनांच्या भरोवशावर येथील नागरिक मिळालेल्या रकमेवर वास्तव्य करीत आहे. मात्र यातील काही सुविधांचा अजुनही अभाव आहे. या पुनर्वसीत गावात रस्ते, सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली, विजेची व्यवस्था नसल्याने नागरिक या सुविधांपासून वंचित आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाची भव्य वास्तू व शाळेची इमारत बांधण्यात आली असली तरी तेथे आवश्यक सुविधा नसल्याने येथील नागरिक व विद्यार्थ्यांना अन्यत्र पायदळी जावे लागते. गावात सार्वजनिक शौचालय, मुत्रीघराची निर्मिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुनर्वसीत गावकऱ्यांना अत्यावश्यक असलेल्या या सर्व सोयींची पुर्तता त्वरीत करून त्यांना मदत करावी, अशी मागणी ओबीसी संग्राम परिषदेचे उमेश मोहतुरे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)