रोहयोच्या मजुरांची मजुरी अडली
By Admin | Updated: May 22, 2014 23:38 IST2014-05-22T23:38:20+5:302014-05-22T23:38:20+5:30
तुमसर तालुक्यातील गावागावात मग्रारोहयोअंतर्गत कामे प्रगतीपथावर असली तरी तब्बल महिनाभरानंतर ही मजुरांना मजुरी मिळाली नाही. रोहयो विभागाच्या भोंगळ

रोहयोच्या मजुरांची मजुरी अडली
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील गावागावात मग्रारोहयोअंतर्गत कामे प्रगतीपथावर असली तरी तब्बल महिनाभरानंतर ही मजुरांना मजुरी मिळाली नाही. रोहयो विभागाच्या भोंगळ कारभाराने सध्या ही योजना तालुक्यात चर्चेत आली आहे. सिहोरा परिसरातील गावात रोहयो अंतर्गत कामे प्रगतीपथावर आहेत. गावागावात पांदसन रस्ते नव्याने तयार केली जात आहेत. या कामावर गावातील मजुर हिरीरीने सहभाग घेत आहेत. परंतु तब्बल महिनाभरानंतर ही मजुरांना मजुरी वाटप करण्यात आली नसल्याने मजुरात असंतोष खदखदत आहे. आदिवासी गावात रोहयो मजुरांचे हालहाल होत आहेत. या योजनेअंतर्गत मजुरांना देण्यात येणारी सर्व सुविधा बंद करण्यात आलेल्या आहेत. रोहयो कामावर साधा पिण्याचे पाणी नाही. आता पिण्याचे पाणी मजुरांना घरुन आणावे लागत आहे. या कामावर औषध नाही. मजुरांना देण्यात येणार्या सुविधा बंद करण्यात आल्याने शासन कुणाच्या विकासाकरीता कार्य करीत आहे, असा सवाल आहे. या योजनेअंतर्गत गावात निकषनुसार सिमेंट रस्ते बांधकाम झाली आहेत. या बांधकामाचे वेतन थकले काय.? असे उत्तर मजुर उपस्थित करीत आहेत. आदिवासी सक्करधरा गावात मजुरांपुढे बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांना बैठकीचे मंडप देण्यात आल्याने ३ महिन्याच्या बाळाला झोका बांधून संरक्षण देण्यात येत आहे. या गावातील मजुरांना अद्याप मजुरी वाटप झाली नाही. यामुऴे गावात संतापाची लाट आहे. गोंडीटोला गावात देवसर्रा ते बिनाखी गावांना जोडणार्या पांदन रस्त्याचे मातीकाम सुरू करण्यात आले आहे. या कामावर ११० मजूर कार्यरत आहेत. ४ एप्रिलला कामाला सुरुवात झाली आहे. दीड महिन्यानंतर ही मजुरांना छदाम मिळाला नाही. तुमसर पंचायत समितीत रोहयो विभाग स्वतंत्ररित्या कार्य करीत आहे. तत्कालीन प्रभारी बीडीओ शांताराम चाफले यांनी मजुरांना कामे आणि वेतन वाटपासाठी या योजनेत जीव ओतले होते. कार्यरत असताना कुठेही बोंबाबोंब नव्हती. परंतु बीडीओ पदाचा प्रभार काढण्यात आला असता स्थिती जैसे थे झाली आहे. दरम्यान गोंडीटोला गावाचा पोष्ट चांदपूर असल्याचा जावईशोध रोहयो विभागाने लावला आहे. या गावातील पोष्ट आॅफीसमध्ये तीन मजुरांचे मजुरी जमा करण्यात आल्याची सुचना प्राप्त झाली आहे. अर्थात चांदपूर गावात पोष्टआॅफीस नसतानाही हा घोळ यंत्रणेने केला आहे. या विभागात सर्व कामे अंधार आणि झोपेत होतात की काय? असा आरोप आता मजूर करीत आहेत. दरम्यान सध्यास्थित रोहयो योजना तालुक्यात भरकटली आहे. मजुरांना कामे देताना लोकप्रतिनिधीही शांत आहेत. सध्या स्थित लग्न सराईची धुम आहे. मजुरांना मजुरी मिळाली नसल्याने अडचणीा सामना करीत आहेत. कामे बंद झाले असतानाही मजुरी वाटपाची टेंगडी सुरु आहे. रोहयो विभागात सध्या ठीकठाक नसल्याने मजुर गावागावात बोंब ठोकत आहेत. रोजगार सेवकही नाकतोंड दाबत आहेत. या शिवाय योजनेवरुन ग्रामसेवक ही बहीरे झाल्यासारखे वागत आहेत. प.स.सभापती कलाम शेख हे लोकसभा निवडणुकीत प्रचार कार्यात गुंतले आणि रोहयोचे नियोजन ढासळले असे सांगण्यात येत आहे. रोहयो मजुरांवर होणारा अन्याय खपवून घेणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. मजुरांचे मजुरी वाटपासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तुमसर पंचायत समितीचा बिडीओचा प्रभार डॉ.शांताराम चाफले यांना देण्यात आला असता रोहयो विभागाने राज्यात क्रमांक १ पटकाविला होता. सामान्य लाभार्थ्यांचे समस्या आणि प्रश्न सोडविण्याचे नियोजन त्यांनी आखले होते. त्यांच्या कारकिर्दीत नवचेतना निर्माण झाली होती. परंतु त्यांचा प्रभार काढण्यात आले असता रोहयो विभागात ७ व्या क्रमांकावर तालुका गेला आहे. यामुळे तालुक्याच्या विकासाकरीता डॉ. चाफले यांना पुन्हा वोन्समोअरचा नारा पदाधिकारी देत आहे. यामुळे प्रभारी डॉ.चाफले यांना देण्यात यावा असा सुर आहे. (वार्ताहर)