क्रांतिसूर्य जोतिबा फुले जयंती उत्साहात

By Admin | Updated: April 13, 2016 00:48 IST2016-04-13T00:48:13+5:302016-04-13T00:48:13+5:30

शिक्षणाचे आद्य गुरू क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांची १८९ वी जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली.

Krantisu Jyotiba Phule Jayanti excited | क्रांतिसूर्य जोतिबा फुले जयंती उत्साहात

क्रांतिसूर्य जोतिबा फुले जयंती उत्साहात

ठिकठिकाणी मार्गदर्शन : रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, रॅली काढून अभिवादन
भंडारा : शिक्षणाचे आद्य गुरू क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांची १८९ वी जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यादरम्यान रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी व मार्गदर्शनासोबतच रॅली काढून त्यांना अभिवादन करण्यात आले.
महात्मा फुले मित्र मंडळ, भंडारा
भंडारा : शहरातील महात्मा फुले वॉर्डातील महात्मा फुले बहुउद्देशीय मित्र मंडळाच्या वतीने जोतिबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बाबू बागडे, भैय्याजी लांबट, कृष्णराव मानकर, मंगेश वंजारी, नेपाल चिचमलकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
दरम्यान शुगर, बीपी, रक्त व दंतचिकित्सा व आरोग्य तपासणी करण्यात आली. यात सुमारे १२० रुग्णांनी लाभ घेतला. ही तपासणी डॉ. नितीन नागरीकर, डॉ. जुही नागरीकर, डॉ. संजय मानकर, डॉ. श्रीकांत आंबेकर, डॉ. श्रुतिका निर्वाण, डॉ. सोनम तोरणकर आदींनी केली. कार्यक्रमाचे संचालन रमेश गोटेफोडे यांनी केले तर आभार अशोक बनकर यांनी मानले.
कार्यक्रमाला अरविंद मंदूरकर, दिनेश देशकर, देवीदास अन्नपूर्णे, योगेश्वरी उमप, संजय बनकर, दुर्गाप्रसाद शेंडे, रामरतन मोहुर्ले, सुशीला निर्वाण, वृंदा गायधने, प्रकाश अटाळकर, नरेंद्र पवनकर, हेमेंत नागरिकर, भागवत किरणापुरे, सुनील नागरिकर, जयश्री सातोकर, संगीता बनकर, रमेश बनकर, वामन नंदुरकर, शंकर बनकर, भागवत किरणापुरे, योगेश सव्वालाखे आदींनी सहकार्य केले.
चैतन्य कला महाविद्यालय, बाम्पेवाडा
साकोली : बाम्पेवाडा येथे चैतन्य कला कनिष्ठ महाविद्यालयात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.जी. मडामे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. टी.डी. वंजारी, प्रा. के.एस. चांदेवार, आर.एस. मानकर, पी.पी. थेर, डी.एन. सोनकुसरे, के.बी. उके, शिक्षिका सोनवाने, मेश्राम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
अन्नाभाऊ साठे स्मारक समिती, भंडारा
भंडारा : शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे चौकात अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. लोकशाहीर अन्नाभाऊ साठे सामाजिक संस्था व स्मारक समितीच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदानंद ईलमे, नगरसेवक हिवराज उके, गणेश ढोके, बाबासाहेब जाधव, ईश्वर कांबळे, रितेश बावणे, रूपेश वाघमारे, दिपक गायकवाड, राजू वानखेडे, अनुप ढोके, रवि जाधव, अक्षय जाधव, माया कांबळे, सेवाबाई गाढव, रूपा पवार आदी उपस्थित होते.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भंडारा
भंडारा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राणा भवन येथे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रेमलाल शहारे, नगरसेवक हिवराज उके, अमित क्षीरसागर, गजानन पाचे, गोपाळ चोपकर, दुर्याेधन कांबळे, सदानंद ईलमे, झुलन नंदागवळी, माणिक कुकडकर, जगतलाल अंबाले, मोहनलाल सिंगाडे, गौतम भोयर, रमेश चोपकर, गोपीचंद भोयर, छबी पाचे, हरीदास जांगडे आदी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी, भंडारा
भंडारा : भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगेश वंजारी, अर्पण पशिने, संजय मते, मंगेश काटेखाये, संजय चौधरी, बालकदास ठवकर, बबलू निंबेकर, शिवशंकर निखारे, हेमंत नागरिकर, योगेश मानकर, रवि चौधरी, हरी उमप आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय माळी महासंघ, लवारी
लवारी : साकोली तालुक्यातील लवारी येथे माळी महासंघ व जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रामधन धकाते हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून हिरालाल किरणापुरे, उपसरपंच अनिल किरणापुरे, रमेश किरणापुरे, राघोजी देशकर, गजानन किरणापुरे, मोतीलाल देशकर, सुरेश नगरीकर, आसाराम किरणापुरे, पद्माकर गोटेफोडे, तेजस्विनी कटनकार, वीणा गोटेफोडे, मंगला वाघाडे, मीनाक्षी गोटेफोडे, के.डी. अतकरी, अनिल भेंडारकर, विनोद भोवते, खरवडे, कावळे, कल्पना बोडलकर, विनोद किरणापुरे, वसंता ईरले यांच्यासह माळी समाज बांधव व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन के.डी. अतकरी यांनी केले तर प्रास्ताविक अनिल भेंडारकर यांनी केले. आभार विनोद भोवते यांनी मानले. (लोकमत चमू)

Web Title: Krantisu Jyotiba Phule Jayanti excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.