बापलेकावर चाकूने हल्ला

By Admin | Updated: November 17, 2015 00:34 IST2015-11-17T00:34:52+5:302015-11-17T00:34:52+5:30

शेजाऱ्याशी असलेला वाद विकोपाला जावून चक्क बापलेकावर चाकुने हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी विरली बु. येथे ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

A knife attack on the father | बापलेकावर चाकूने हल्ला

बापलेकावर चाकूने हल्ला

एक गंभीर : विरली बु. येथील घटना
लाखांदूर : शेजाऱ्याशी असलेला वाद विकोपाला जावून चक्क बापलेकावर चाकुने हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी विरली बु. येथे ६.३० वाजताच्या सुमारास घडली. यात वडील गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
गौतम श्रावण हुमणे (५५) रा.विरली बु. व धीरज गौतम हुमणे (२३) असे जखमीचे नाव आहे. वडील गंभीर जखमी असून खाकेत व पोटावर धारदार चाकुने हल्ला केल्याने प्रकृती चिंताजनक आहे. तर मुलावर खाकेत वार केल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमीची पत्नी संगम गौतम हुमणे (४५) हिचा शेजारील रतन देवाजी हुमणे (४०) याचेशी सायंकाळी ६.३० वाजता भांडण झाले. त्यामुळे जखमींनी वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केली असता आरोपी रतनने दोघा बापलेकांवर धारदार चाकुने सपासप वार केला. यात दोघेही जखमी झाले. लगेच जखमींनी पोलिस ठाणयात तक्रार दाखल केली.
जखमींच्या सांगण्यावरून आरोपी रतनने चाकुने हल्ला केल्याचे सांगण्यात आले असले तरी वृत्त लिहिपर्यंत आरोपीला अटक झाली नव्हती. पोलीस निरीक्षक देवीदास भोयर तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: A knife attack on the father