किडनीचे आजार शरीरासाठी घातक

By Admin | Updated: March 10, 2016 00:50 IST2016-03-10T00:50:52+5:302016-03-10T00:50:52+5:30

किडनी ही शरीराची मुख्यवाहिनी समजली जाते. किडनीमुळेच शरीराचे आरोग्य टिकुन असते. त्यातच अचानक किंवा तात्पुरत्या किडनी विकाराबद्दल सर्वांना माहिती होणे, ...

Kidney disease is dangerous for the body | किडनीचे आजार शरीरासाठी घातक

किडनीचे आजार शरीरासाठी घातक

आज किडनी दिन : बालकांमध्येही आजाराची लागण
प्रशांत देसाई  भंडारा
किडनी ही शरीराची मुख्यवाहिनी समजली जाते. किडनीमुळेच शरीराचे आरोग्य टिकुन असते. त्यातच अचानक किंवा तात्पुरत्या किडनी विकाराबद्दल सर्वांना माहिती होणे, या विकारात आजाराचा धोका कमी करून, त्याचे लवकरात लवकर निदान, योग्य उपचार होणे, कायमची किडनी बंद पडू नये म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अचानक होणारे किडनी विकार (तात्पुरती किडनी बंद पडणे), हा विकार पूर्ण जगात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आजारात मृत्यूचे प्रमाण, त्यापासून होणारे कायमचे शरीराचे नुकसान जास्त असते. यात महत्वाची बाब एकच आहे, या आजाराचे जर लवकरात लवकर निदान होवून योग्य औषधोपचार करण्यात आला तर त्या होणारे नुकसान निश्चितच कमी करता येते. प्रगत राष्टांमध्ये जवळजवळ २,१४७ ते ४,०८५ रूग्ण एक मिलीयन लोकसंख्येत आढळून येतात. त्यातच २० टक्के रूग्ण रूग्णालयात दाखल असतात. तर ४५ टक्के रूग्ण हे अतिदक्षता विभागातील रूग्णांमध्ये आढळतात. डायलिसिसचा जवळ जवळ ५.६ टक्के रूग्णांमध्ये अतिदक्षता विभागात उपचार लागतो. हा आजार विशेष करुन प्रौढ व्यक्तीमध्ये, त्यातच जास्त अवयवांचे आजार असलेल्यांमध्ये जास्त प्रमाणात वेगवेगळ्या औषधींच्या वापरामुळे या आजाराचे प्रमाण वाढते.
वेगवेगळी कारण अशा रूग्णांमध्ये किडनी खराब होण्याकरिता कारणीभूत असतात.
यात किडनीस होणारा रक्तपुरवठा कमी प्रमाणात झाल्यास (अपघातात, बाळंतपणात, आॅपरेशनमध्ये) रक्तदाब (बी.पी.) कमी होवून जुलाब, वारंवार उलट्या, ताप, जंतुसंसर्ग, मलेरीया (विशेष करून फालसिपारम), डेंग्यू. एखाद्यास औषधाचं प्रमाणाबाहेर सेवन विशेषत: वेदनाशामक औषधे, गुंगी आणणारे औषधे, गांजा, अल्कोहोल, मारफीन, नारकोटीक्स, कावीळ, स्वादुपिंड ग्रंथीचे विकार, मूतखडा, मूत्रमार्गातील ट्यूमर, प्रोस्टेड ग्रंथीची वाढ, काही किडणीचे ग्लोमरूलसेच विकार, (सेप्टीसिमीया) जंतु संसर्ग पूर्ण शरीरात पसरणे, हॉस्पीटलमधील जंतुसंसर्ग, एक्सरे करण्याकरिता देण्यात येणारी औषधी यांचेमुळे देखील किडनी बंद पडते.
तात्पुरते किडनी विकार लहान मुलांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यांत हिमोलायटिक युरेमिक सिंड्रौम, ग्लोमेरूलोनेफ्रायटीस हे विकार आढळतात. किडनीचा रक्तपुरवठा कमी होणे, वेगवेगळ्या औषधाचा किडनीवर होणारा परिणाम, जंतुसंसर्ग महत्वाची कारणे आहेत. बऱ्याच लहान मुलांमध्ये हा विकार मृत्यूस कारणीभूत ठरतो. किडणीचा रक्तपुरवठा कमी होणे यामुळे बऱ्याच वेळा जास्त प्रमाणात शरीरात पाणी साठले जावून किडनी बंद पडते.
या विकारात दुरूस्ती होण्याकरिता खर्च देखील जास्त लागतो. त्यातच हॉस्पीटलमध्ये जास्त दिवस रहावे लागते. बऱ्याचवेळा इतर अवयव देखील विकारग्रस्त होतात. वेळेवर किडनी न दुरूस्त झाल्यास किडनी पूर्णपणे निकामी होवून कायमचे डायलिसीसची वेळ येते. तात्पुरता किडनी विकार, सर्वत्र आढळणारा धोकादायक, वेळीच काळजी घेतल्यास न होणारा, त्यातच योग्य औषधोपचारांनी दुरूस्त होणारा आजार आहे.

Web Title: Kidney disease is dangerous for the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.