लाखणी तालुका सुंदर गाव स्पर्धेत खराशी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST2021-02-17T04:42:12+5:302021-02-17T04:42:12+5:30
१६ लोक २८ के खराशी : जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत आर.आर. पाटील सुंदर गाव योजना २०१९-२० मध्ये लाखनी तालुक्यात ...

लाखणी तालुका सुंदर गाव स्पर्धेत खराशी प्रथम
१६ लोक २८ के
खराशी : जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत आर.आर. पाटील सुंदर गाव योजना २०१९-२० मध्ये लाखनी तालुक्यात खराशी या ग्रामपंचायतीने प्रथम पुरस्कार पटकवित १० लाख रुपयाच्या रोख रकमेचे मानकरी ठरले आहे. या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाले. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विनय मून तथा संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. हा पुरस्कार खराशीच्या सरपंचा अंकिता झलके यांनी स्वीकारला. यावेळी उपसरपंच सुधन्वा चेटुले, ग्रामसेवक मेश्राम, तसेच इतर ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते. यानंतर स्मार्ट ग्राम स्पर्धा जिल्हा स्तरावर होणार असून जिल्ह्यात सुध्दा प्रथम क्रमांक मिळवू असा आशावाद उपसरपंच सुधन्वा चेटुले यांनी व्यक्त केला. या पुरस्काराचे श्रेय खराशी येथील जनतेला समर्पित केले. प.स.लाखनी येथील खंडविकास अधिकारी, विस्तार अधिकारी चकोले खराशी येथील सामाजिक कार्यकर्ते योगराज झलके,मनोहर झलके,सुभाष ढोके,पुरुषोत्तम फटे,मुख्या.मुबारक सैयद,शतिश चिंधालोरे जितेंद्र बोंद्रे ,राम चाचेरे यांचे सहकार्याबाबत आभार मानले.