खंदाळा वाघ मृत्यू प्रकरणी आरोपीची कारागृहात रवानगी, तुमसर न्यायालयाचे आदेश
By युवराज गोमास | Updated: August 21, 2023 19:33 IST2023-08-21T19:33:46+5:302023-08-21T19:33:50+5:30
आरोपीने दिली गुन्हयाची कबुली

खंदाळा वाघ मृत्यू प्रकरणी आरोपीची कारागृहात रवानगी, तुमसर न्यायालयाचे आदेश
भंडारा : मौजा खंदाळ येथे १६ ऑगस्ट रोजी शेतशिवारात वाघ मृतावस्थेत आढळून आला. तपासात रतनलाल अनंतराम वाघमारे रा. खंदाळ यास अटक करण्यात आली होती. त्याची कसून चौकशी केली असता त्याने कबुली दिली. याप्रकरणी २१ ऑगस्ट रोजी आरोपीला तुमसर न्यायदंडाधिकारी यांचेसमक्ष हजर करण्यात आले, न्यायालयाने आरोपीला २ सप्टेंबरपर्यंत जिल्हा कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले आहे.सदर वनगुन्हाचा तपास उपवनसंरक्षक राहुल गवई व गडेगाव आगाराचे प्रकाष्ट निष्कासन अधिकारी साकेत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी सी. जी. रहांगडाले करित आहेत.
या कार्यवाहीसाठी भंडारा फिरते पथक प्रमुख एस. टी. मेंढे, बिटरक्षक ए. जे. वासनिक, डेव्हीडकुमार मेश्राम, यु. के. ढोके, असलम शेख, व्ही. बी. सोनवाने, एस. पी. डेहनकर, एन. एस. भुरे, डी. ए. कहुळकर, आर. ए. वाघाडे, ओ. एन. मोरे, अमोल ठवकर, ए. डी. कुंजाम, आर. आर. पचारे, कु. एस. एस. सेलोकर, कु. आर. डी. चौधरी, वाहन चालक दिनेश शेंडे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.