‘खाकी’ची राेगप्रतिकार शक्ती वाढली, दुसऱ्या लाटेत काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST2021-05-21T05:00:00+5:302021-05-21T05:00:46+5:30
भंडारा जिल्ह्यात पाेलीस दलात ११७ अधिकारी आणि १४३८ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पाेलीस दलात प्रबळपणे लसीकरण माेहीम राबविण्यात आली. जवळपास सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कायम नागरिकांच्या संपर्कात अधिकारी व कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धाेका अधिक असताे.

‘खाकी’ची राेगप्रतिकार शक्ती वाढली, दुसऱ्या लाटेत काेराेनावर मात
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लसीकरण झालेल्यांची राेगप्रतिकार शक्ती वाढल्याने काेराेना हाेऊनही मृत्यूदर शून्यावर आल्याचे भंडारा जिल्हा पाेलीस दलात दिसून येत आहे. नियमित व्यायाम आणि प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी केलेल्या उपाययाेजनेचे हे फलित हाेय.
भंडारा जिल्ह्यात पाेलीस दलात ११७ अधिकारी आणि १४३८ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पाेलीस दलात प्रबळपणे लसीकरण माेहीम राबविण्यात आली. जवळपास सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कायम नागरिकांच्या संपर्कात अधिकारी व कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धाेका अधिक असताे. परंतु आता लसीकरण झाल्याने काही कर्मचाऱ्यांना काेराेनाची बाधा झाली असली तरी त्यावर यशस्वीपणे त्यांनी मात केली आहे.
नियमित व्यायाम महत्वाचा
राेगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा आहे. त्यासाेबतच संतुलित आहारही महत्वाचा आहे. जिल्हा पाेलीस दलातील कर्मचारी व अधिकारी दरराेज नियमित व्यायाम करतात. यासाेबतच जिल्हा पाेलीस दलाच्यावतीने मेडिटेशन शिबिरासह याेगासनाबाबतही विविध शिबिरांचे आयाेजन केले आहे. त्यामुळेच दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील पाेलिसांना काेराेनाची बाधा झाली नाही. आजही जिल्हा मुख्यालयातील पाेलीस परेड ग्राऊंडसह विविध ठाण्यात पाेलीस व्यायाम करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे शरीरात राेगप्रतिकार शक्ती वाढते. काेराेना संसर्गात कर्तव्य बजावताना अनेकांशी संपर्क येताे. मात्र लसीकरणानंतर आता मनात भीती राहिली नाही. तरीही आम्ही सर्व नियमांचे पालन करुनच आपले कर्तव्य बजावताे.
- रमाकांत दिक्षीत,
पाेलीस उपनिरीक्षक
कर्तव्याच्या निमित्ताने सतत बाहेर रहावे लागते. लसीकरण झाले असले तरी काेराेना नियमांचे पालन केले जाते. ठाण्यात असाे की घरी, स्वच्छतेला महत्व दिले जाते. राेगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी नियमित व्यायाम आणि याेग्य आहार घेताे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करताे.
- बापूराव भुसावळे,
पाेलीस हवालदार
भंडारा जिल्हा पाेलीस दलात पहिल्या लाटेत दुर्देवाने पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर आपण लसीकरणासाठी पुढाकार घेतला. सर्वांचे लसीकरण करुन घेतले. त्यामुळेच आता दुसऱ्या लाटेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. काेराेनावरील लस प्रभावी असल्याचे यावरुन सिध्द हाेते. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करुन घेणे गरजेचे झाले आहे.
- वसंत जाधव,
जिल्हा पाेलीस अधीक्षक