जिल्ह्यात शांतता राखा
By Admin | Updated: July 29, 2014 23:38 IST2014-07-29T23:38:56+5:302014-07-29T23:38:56+5:30
शहरात घडलेल्या घटनेसंदर्भात काही संघटनांनी भंडारा जिल्हा बंदचे केलेले आवाहन जिल्ह्यातकायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी बंद मागे घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले आहे.

जिल्ह्यात शांतता राखा
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : शांतता कमिटीच्या सभेत शांतता राखण्याची सदस्यांची ग्वाही
भंडारा : शहरात घडलेल्या घटनेसंदर्भात काही संघटनांनी भंडारा जिल्हा बंदचे केलेले आवाहन जिल्ह्यातकायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी बंद मागे घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी शहरात उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक कैलाश कणसे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे, तहसीलदारसुशांत बनसोडे व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी समितीच्या सदस्यांना जिल्ह्यात शांतता राखण्यासंदर्भात डॉ.खोडे यांनी सूचना केल्या. भविष्यात येणारे सण व निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यातील शांतता भंग होणार नाही, या दृष्टीने सर्वांनी सजग राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीला शांतता समितीचे सदस्य जयेश सांघानी, अॅड.शशीर वंजारी, शेखर गभणे, सॅम्युअल गजभिये, सामाजिक कार्यकर्ते इकबाल सिद्धीकी, नगरसेवक मकसुद खान, परवेज पटेल आदी सदस्यांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात विचार व्यक्त केले. जातीय सलोखा कायम राहील यादृष्टीने सर्वांकडून प्रयत्न केले जातील आणि शांतता भंग होणार नाही, अशी ग्वाही शांतता समितीच्या सर्व सदस्यांनी यावेळी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)