विकास साधताना पर्यावरणाचा समतोल ठेवा
By Admin | Updated: March 8, 2015 00:27 IST2015-03-08T00:27:27+5:302015-03-08T00:27:27+5:30
तंत्रज्ञानाच्या हव्यासापोटी व विकास साधताना पर्यावरणाच्या समतोल बिघडणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी, विज्ञानाच्या एकांगी विकासांमुळे ...

विकास साधताना पर्यावरणाचा समतोल ठेवा
पवनी : तंत्रज्ञानाच्या हव्यासापोटी व विकास साधताना पर्यावरणाच्या समतोल बिघडणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी, विज्ञानाच्या एकांगी विकासांमुळे भविष्यात मानव पृथ्वीतलावरुन विलुप्त होईल, असा संशय डॉ. सतीश वटे यांनी व्यक्त केला.
पवनी येथे आयोजित राज्यस्तरीय मानवी कृतींचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयावरील चर्चासत्रादरम्यान त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी मानवाने निसर्गावर मात करायचा प्रयत्न सोडून द्यावा व पर्यावरणाचा मातेसमान सन्मान करावा असे आवाहन ही केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालीत विज्ञान महाविद्यालय पवनी येथे मानवी कृतींचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयावर बुधवारला चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. अरुणकुमार शेळके, डॉ. सतिश वटे, डॉ. के.सी. देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होतीे.
तीन सत्रामध्ये आयोजित चर्चासत्राच्या पहिला सत्रामध्ये निरी नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. गोयल यांनी मानवी कृतीचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम आणि श्वावत विकास या विषयावर परिणामकारक पद्घतीने आपले विचार मांडले. दुसऱ्या सत्रात नोयडा (उ.प्र.) येथील शास्त्रज्ञ डॉ. पी.आर. चौधरी यांनी वायुप्रदूषणाची सद्यस्थिती आणि त्याचा मानवाच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम या विषयावर साध्या व सोप्या भाषेत परिणामकारक आपले विचार मांडले. तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात जागतिक बँकेचे सल्लागार आणि पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. रमेश ठाकरे यांनी मानवी उत्सर्जनाचा कृषी वर होणारा परिणाम या विषयावर व्याख्यान दिले.
समारोपीय कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुरेश ठाकरे आणि प्राचार्य डॉ. डी.के. बुरघाटे यांच्या उपस्थितीत पार पडला. या चर्चासत्राला राज्यातील विविध विद्यापीठातील सुमारे २०० संशोधक प्राध्यापक आणि महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी मागील दोन महिन्यापासुन प्राचार्य डॉ. डी.के. बुरघाटे, डॉ.जी.ए.अवचार यांचा मार्गदर्शनाखाली प्रा. विजय लेपसे संयोजक, प्रा. ए.के. अणे, सहसंयोजक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत होते. (तालुका प्रतिनिधी)