शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: July 28, 2014 23:22 IST

ग्रामपंचायत कोसरा येथील तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी नाली उपसा व मलभा फेकण्याच्या कामात अपहार केला होता. उपहाराची रक्कम २९,९४० रुपये ग्रा.पं. फंडात जमा करण्याचे आदेश

भंडारा : ग्रामपंचायत कोसरा येथील तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी नाली उपसा व मलभा फेकण्याच्या कामात अपहार केला होता. उपहाराची रक्कम २९,९४० रुपये ग्रा.पं. फंडात जमा करण्याचे आदेश मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. भंडारा यांनी काढले होते. मात्र तीन वर्षापासून रक्कम जमा न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.ग्रामपंचायतीमध्ये जनतेच्या करापासून जमा झालेला निधीच्या अफरातफरीच्या घटना वाढत आहेत. ग्रा.पं. सरपंच, सदस्य व ग्रामसेवक संगनमताने ग्रामपंचायत निधीची वाट कशी लावतात याचा नमुना ग्रा.पं. कोसरा येथे झाले. सन २००९-१० या वर्षात त्यावेळच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी नाली उपसा व मलबा फेकण्यासाठी वापरलेल्या निधीमध्ये मोठा अपहार केला होता. यासंबंधात वरिष्ठांना तक्रार केल्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. भंडारा यांनी १ जुलै २०११ ला तत्कालीन सरपंच संजय रत्नपारखी, उपसरपंच राजू गभणे, ग्रामविकास अधिकारी आर.एम. धांडे व ग्रामसेवक एस.बी. भलावी यांची सुनावणी घेतली. त्यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेसमोर सर्वांनी आपले लेखी उत्तर पुरावे सादर केले होते. परंतु त्याने समाधान न झाल्याने मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. भंडारा यांनी नाली उपसा व मलबा फेकण्याच्या शासकीय कामासाठी निधीचा अपहार झाल्याने प्रत्येकी ७,४८५ रुपये असे एकूण २९,९४० रुपये ग्राम पंचायत कोसरा येथील सामान्य फंडात जमा करण्याचे आदेश ७ डिसेंबर २०११ रोजी दिले. आदेशानुसार सर्वांनी रक्कम फंडात जमा करणे आवश्यक होते. परंतु अजूनपर्यंत अपहाराची रक्कम जमा झाली नाही. असे सध्याचे सरपंच हर्षवर्धन हुमणे यांनी सांगितले. खंडविकास अधिकारी पंचायत समिती पवनी यांनी देखील तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना पत्र देऊन वसुलीची रक्कम सामान्य फंडात भरण्याचे पत्र दिले. सरपंच यांनी देखील वसुलीची रक्कम भरण्याची लेखी सूचना दिली होती. मात्र रक्कम भरण्यात आली नाही. मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी आदेश पारीत केला. मात्र तीन वर्षानंतरही रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे पदाधिकारी, कर्मचारी, मुख्यकार्यपालन अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवित आहेत. (वार्ताहर)