शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

कारधा पूल बुडाला, वैनगंगा धोक्याची पातळी ओलांडून दीड मीटरवर

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: September 16, 2023 11:14 IST

पाण्याची पातळी वाढतच असल्याने  सखल भागातील बाधित गावकऱ्यांना आणि नागरिकांना प्रशासनाने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू केले आहे. 

भंडारा : वैनगंगा नदी रात्री दीड वाजतापासून धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे. भंडारा शहरालगतचा कारधा पूल पाण्याखाली गेला असून या पुलावरील धोक्याी पातळी ओलांडून दीड मिटर पाणी वाहात आहे. यामुळे वहनगंगेच्या काठावरील गावांमध्ये पुराची स्थिती निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. पाण्याची पातळी वाढतच असल्याने  सखल भागातील बाधित गावकऱ्यांना आणि नागरिकांना प्रशासनाने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू केले आहे. 

सलग दोन दिवस पाऊस झाला. यामुळे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पाण्याची पातळी वाढतच असल्याने गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे दीड मिटरने उघडण्यात आले आहेत. १६,४८९.६९ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पलिकडील भागात पुराची स्थिती निर्मण झाली आहे. पवनी तालुक्यातील काही ग्रामीण मार्ग बंद पडले आहेत.

संजय सरोवरचे ५ गेट सुरू मध्यप्रदेशातील संजय सरोवरचे पाच गेट सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सायंकाळपर्यंत पुन्हा पाण्याची पातळी वाढण्याची शक्यत आहे. धापेवाडा धरणांतून मागील १२ तासांपासून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कारधा पुलावर सकाळी १०:३० वाजता पाण्याची पातळी २४६.५० मिटर नोंदविण्यात आली आहे. 

मार्ग बंदजिल्हा प्रशासनाने निलेल्या महितुनुसार, पवनी तालुक्यातील गुडेगाव, उमरी, जुनोना, माहुली, रेवनी ते कोदुर्ला हे मार्ग बंद पडले आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा ते सुकळी, मांढळ ते सुकळी, महालगाव ते मोरगाव हे मार्ग बंद पडले आहेत. तुमसर तालुक्यातील तुमसर ते येवली, पिपरा आणि तामसवाडी ते उमरगाव हे मार्गही पुलावरून तीन ते चार फुट पाणी असल्याने बंद आहेत. 

१० कुटूंब स्थलांतरीतपुराची स्थिती आणी वाढता जलस्तर लक्षात घेता, भंडारा शहतालगतच्या गणेशपूर येथील ४ कुटूंब स्थलांतरित करण्यात आले आहेत. तसेच, भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनीतील २ आणि कारधा गावातील ४ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात तेथील ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आले आहे. या सोबत, शहरातील टप्पा मोहल्ला, मेंढा, गणेशपूर, सागर तलावच्या मागचा भाग येथील येथील लोकांनाही विस्थापित केले जात आहे. 

टॅग्स :Rainपाऊसriverनदी