करडी पोलीस ठाणे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: August 14, 2014 23:35 IST2014-08-14T23:35:20+5:302014-08-14T23:35:20+5:30

मोहाडी पोलीस ठाण्यांर्गत असलेल्या करडी चौकीचे सन २०१४ वर्षाच्या सुरुवातीला पोलीस ठाण्यामध्ये रूपांतर करण्यात आले. ठाणेदाराचे कार्यालय व पोलिसांच्या निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण झाले.

The Karadi police station awaiting the inauguration | करडी पोलीस ठाणे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

करडी पोलीस ठाणे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

करडी(पालोरा) : मोहाडी पोलीस ठाण्यांर्गत असलेल्या करडी चौकीचे सन २०१४ वर्षाच्या सुरुवातीला पोलीस ठाण्यामध्ये रूपांतर करण्यात आले. ठाणेदाराचे कार्यालय व पोलिसांच्या निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण झाले. परिसरातील नागरिक उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र अजूनही पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाची तारीख ठरलेली नाही.
करडी पोलीस चौकीमध्ये सध्या ३ पोलीस कार्यरत आहेत. त्यामध्ये डिसेंबर २०१३ पासून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्विनकुमार मेहर, हवालदार आसाराम नंदेश्वर, नायब शिपाई गौरीशंकर गौतम यांचा समावेश आहे. ३ पोलिसांवर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत अवैध धंद्यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी आहे. जबाबदारी पार पाडताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. असे असतानाही त्यांनी त्यात यश मिळविले आहे. परिसरातीलल २५ गावात अवैध दारुचे धंदे बंद करण्याबरोबर अवैध प्रवासी वाहतूक, कोंबडा बाजार, मॅग्नीजची तस्करी, रेती माफियांवर नियंत्रण मिळविण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनाचे माध्यमातून बसस्थानकात वाहतुकीला अडचणीचे ठरणारे मटन मार्केट व इतर दुकाने हटवून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आले. सामान्य नागरिकांच्या तक्रारीवर वेळीच उपाय योजना केली जाते. किरकोळ प्रकरणे, घरगुती वादविवाद, पाणी व शेत संबंधीचे प्रश्न तत्काळ दखल घेऊन लोकसहभागातून व तंटामुक्त गाव समित्यांच्या माध्यमातून सोडविले जातात. नागरिकांच्या थेट संपर्कामुळे पोलिसांवरचा विश्वास वाढीस लागला असून राजकीय व्यक्तींच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या आहेत. तक्रारींवर वेळीच कायदेशीर कार्यवाही केली जात असल्याने समाजात पोलिसांविषयी असलेले समज-गैरसमज दूर होण्यास मदत झाली आहे. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. अपघातामध्ये वेळीच सहकार्य व मदत मिळत असल्याने पोलिसांविषयीच्या दृष्टीकोनात बदल जाणवत आहे.
नव्या पोलीस स्टेशनच्या मंजुरीने नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या पूर्ण होणार किंवा नाही हे काळच ठरवणार आहे. मात्र सध्यातरी १५ आॅगस्टच्या उद्घाटनाचा संभाव्य मुहूर्त टळलेला दिसत आहे. (वार्ताहर)

Web Title: The Karadi police station awaiting the inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.