भंडारा जिल्ह्यातील तुमसरमधल्या अल्पसंख्यक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष कलाम शेख यांचा भाजपाला रामराम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 11:38 IST2018-01-12T11:32:56+5:302018-01-12T11:38:48+5:30
तुमसर तालुक्याचे भाजपा अल्पसंख्यक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष व २५ वर्षांपासून रा.स्व. संघाचे कट्टर समर्थक असलेल्या कलाम शेख यांनी गुरुवारी सकाळी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून भाजपला एक दणका दिला आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसरमधल्या अल्पसंख्यक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष कलाम शेख यांचा भाजपाला रामराम!
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: तुमसर तालुक्याचे भाजपा अल्पसंख्यक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष व २५ वर्षांपासून रा.स्व. संघाचे कट्टर समर्थक असलेल्या कलाम शेख यांनी गुरुवारी सकाळी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून भाजपला एक दणका दिला आहे. पक्षात असलेली हुकूमशाही व कार्यकर्त्यांमधील असंतोषामुळे आपण राजीनामा देत आहोत असे त्यांचे सांगणे असून पुढे कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप सोडून आता काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नाना पटोले व शिशुपाल पटले यांच्या भाजपाप्रवेशामागे कलाम शेख यांचा मोठा वाटा होता. ते गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात सक्रीय होते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान म्हणून ओळखले जात होते.
गुरुवारी सकाळी त्यांनी आपला राजीनामा जिल्हा अध्यक्षांकडे सोपविला आहे.