शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाड्यांची ट्रॅव्हल्स उड्डाण पुलाला धडकली

By admin | Updated: April 26, 2017 00:29 IST

नागपूरहून ठाणा पेट्रोलपंपकडे लग्नाची वरात घेऊन येणारी ट्रॅव्हल ठाणा पेट्रोलपंप टी-पार्इंट उड्डाण पुलाला आदळली. यात वाहन चालक जखमी झाला.

वाहनचालक जखमी : ५५ ते ६० वऱ्हाडी बचावलेजवाहरनगर : नागपूरहून ठाणा पेट्रोलपंपकडे लग्नाची वरात घेऊन येणारी ट्रॅव्हल ठाणा पेट्रोलपंप टी-पार्इंट उड्डाण पुलाला आदळली. यात वाहन चालक जखमी झाला. मात्र यातील सुमारे ५५ ते ६० वऱ्हाडी सुखरूप बचावले. ही घटना सोमवारला रात्री ठाणा येथे घडली.ठाणा पेट्रोलपंप येथील यशोराज रामटेके यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी वधुपक्षाकडील मंडळी ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ३१/डी एस ३९६९ ने ६० वऱ्हाड्यासमवेत सायंकाळी जवाहरनगरला येत होते. सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास वाहन चालकांचे संतुलन बिघडल्याने वाहन डोलायला लागले. चालकाने प्रथम उजव्या बाजुला असलेल्या नालीला धडक दिली. थोडा दूर जाऊन डाव्या बाजुला असलेल्या उडाण पुलाच्या भिंतीला वाहन आदळले. रस्त्यावरील दुचाकी, प्रवासी, बस यांना वाचवित शेवटी ठाणा टीपार्इंटजवळील उड्डाण पुलाच्या खालील पिल्लरला जाऊन आदळली आणि गाडी तिथेच बंद पडली. त्यानंतर वऱ्हाड्यांना वाहनातून बाहेर काढण्यात आले. वाहन चालकाच्या समयसुचकतेमुळे अनर्थ टळला. ठाणा येथील तरूणांनी वाहनचालकाला बाहेर काढले. घटनेची माहिती होताण राष्ट्रीय महामार्ग पथक व जवाहरनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला प्रथम जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचाराकरिता नागपूरला हलविण्यात आले. (वार्ताहर)