ऐतिहासिक पोळ्यात उसळला जनसागर

By Admin | Updated: September 2, 2016 00:36 IST2016-09-02T00:36:30+5:302016-09-02T00:36:30+5:30

परसोडी- जवाहरनगर येथे १८५८ पासून ऐतिहासीक पोळा भरतो. याहिवर्षी मोठ्या उत्साहात पोळा साजरा करण्यात आला.

Jansagar, in the historic landmark | ऐतिहासिक पोळ्यात उसळला जनसागर

ऐतिहासिक पोळ्यात उसळला जनसागर

१५८ वर्षांची परंपरा : परसोडी-जवाहरनगर येथील पोळा, विदेशी पर्यटकांची हजेरी
जवाहरनगर : परसोडी- जवाहरनगर येथे १८५८ पासून ऐतिहासीक पोळा भरतो. याहिवर्षी मोठ्या उत्साहात पोळा साजरा करण्यात आला. उत्कृष्ट बैलजोडी सजावटीकरिता पुरस्कार देण्यात आले.
परसोडीवासीयांनी जपलेली १५८ भुषणावह वर्षाची परंपरा पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. पोळा पंचकमेटी, ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पोळ्याचे आयोजन करण्यात आले. बालगोपालांपासून तर सगळ्यांची गर्दी होती. यावर्षी ५२ जोडींनी पोळ्यात हजेरी लावली. बैलजोडीला पुरस्कार मिळेल या आशेपोटी बैलाची सजावट कायम टिकवून ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे आयोजनकर्त्यांनी आंब्याच्या पानांचे तोरणही बैलजोड्यासाठी अपुरे पडले.
झडती म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली. यात राजकपूर राऊत, मनसाराम वंजारी, डोमाजी सुखदेवे, खुशाल फंदे यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर होते. यावेळी उपसरपंच दर्शन फंदे, देवचंद सेलोकर, तंटामुक्ती अध्यक्ष होमदेव चकोले, मोतीलाल येळणे, ग्रा.पं. सदस्य, तिजा बावनकुळे, ओमगणेश थापा, कुंदा हटवार, बंडू हटवार, कल्पना मोटघरे, लिलाधर चोपकर, माजी पोलीस पाटील काशीनाथ वंजारी, पृथ्वीराज शेंडे, भाऊराव वैरागडे, भागवत घोल्लर, ताराचंद गजभिये, माजी सभापती राजकपूर राऊत, रघुपती फंदे, कुलदीप कावळे, पे्रमसागर वैरागडे, शाम हटवार उपस्थित होते.
पाहुण्याच्या हस्ते बैलजोड्याचे निरीक्षण करण्यात आले. उत्कृष्ट बैल सजावटीकरीता उपस्थितांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यात प्रविण बडवाईक, किसन बावनकुळे, विलास वंजारी, रामेश्वर डोरले, श्रावण हटवार, लोकेश हटवार, संतोष हटवार, अनुप हटवार, दिनेश कडबे, मच्छींद्र फंदे, दिलीप दादुरवाडे, अजय हटवार, लवा गभणे, भगवान वंजारी, अंबादास बंसोड यांचा समावेश आहे. यावर्षी प्रथम पारितोषीक सरपंच पंकज सुखदेवे यांच्याकडून गोदरेज सोकेस देण्यात आले. प्रास्ताविक मारोतराव हटवार यांनी केले. संचालन चेतन चोपकर यांनी केले. आभार माजी समाजकल्याण सभापती राजकपूर राऊत यांनी मानले. (वार्ताहर)

लवारीतही उत्साह
लवारी : साकोली तालुक्यातील लवारी येथे बैलपोळा बक्षीस देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा पोळा देवस्थानपंच कमेटी व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरा करण्यात आला. गावातील सर्व जोड्या एकत्र येवून त्या जोड्याचे पंच कमिटीच्या वतीने निरीक्षक करण्यात आले. उत्कृष्ठ सजावट असलेल्या जोडीला बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी गावकरी झडत्या म्हणून पोळ्यात भर घातली. अशा प्रकारे लवारी येथील बैलपोळा पार पडला. या कार्यक्रमाला पोलीस पाटील विनोद किरणापुरे, देवस्थान अध्यक्ष गजानन किरणापुरे, उपाध्यक्ष पुरूषोत्तम कापगते, सचिव दामोधर गोटेफोडे, तंमुस अध्यक्ष यादोराव मेश्राम, उपसरपंच अनिता किरणापुरे, सुरेश नगरीकर, चंदू कापगते, श्रीराम महाजन, आसाराम किरणापुरे, लेसमन लांजेवार, मोहन समरीत, सेवक निखारे, दामु कुलसिंगे यांच्यासह ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Jansagar, in the historic landmark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.