इटियाडोह धरणाचा मुख्य कालवा फुटला

By Admin | Updated: August 23, 2014 01:27 IST2014-08-23T01:27:45+5:302014-08-23T01:27:45+5:30

पावसाने दडी मारल्याने इडियाडोह धरणाच्या पाण्यावर लाखांदूर तालुक्यातील शेती सिंचित होते. सद्यस्थितीत कालव्याचे पाणी सुरू असताना हा कालवा फुटला.

Itidah dam main canal split | इटियाडोह धरणाचा मुख्य कालवा फुटला

इटियाडोह धरणाचा मुख्य कालवा फुटला

लाखांदूर : पावसाने दडी मारल्याने इडियाडोह धरणाच्या पाण्यावर लाखांदूर तालुक्यातील शेती सिंचित होते. सद्यस्थितीत कालव्याचे पाणी सुरू असताना हा कालवा फुटला. त्यातून हजारो क्यूसेक पाणी वाहून गेले. त्यामुळे सिंचनासाठी चार दिवस पाणी मिळणार नाही. परिणामी २,७०० हेक्टर क्षेत्रातील धानपिक धोक्यात आले आहे.
इटियाडोह धरणाच्या पाण्याचा भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती खरीप व रबी पिकाला फायदा व्हायचा. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे लाखांदूर तालुक्यातील २,७०० हेक्टर शेतीसाठी इटियाडोह धरणाची पाण्याच्या माध्यमातून सिंचन सुरू होते. तालुक्यातील बारव्हा, लाखांदूर, पिंपळगाव, सोनी, चिचोली, चप्राड, कन्हाळगाव, पुयार, इंदिरा येथे नियमित पाणी पुरवठा होत होता.
मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे धरणाचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यानुसार पाणी सोडण्यात आले. तालुक्यात पाणी वाटप व वसुलीचे अधिकार पाणी वापर संस्थांना देण्यात आले. गावागावात संस्था तयार करण्यात आले आहेत. परंतू, संस्थांच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षापासून दुरूस्त न केल्याने लिकेज पाणी वाहून जात आहे.
पाण्याचा मार्ग अनेक ठिकाणी बंद झाल्यामुळे कालव्याला तडे जावून फुटण्याची शक्यता बळावली आहे. दि.१८ आॅगस्ट रोजी पाणी सोडण्यात आले. परंतु, मालनपूर गावाजवळ साखळी क्रमांक १६३०० जवळ मुख्य कालवा फुटला. त्यातून हजारो क्यूसेक पाणी वाहून जात आहे.
कालवा दुरूस्तीकरिता आणखी दोन ते चार दिवसाचा कालावधी लागणार असून शेतीला सध्या पाणी मिळणार नसल्याचे शाखा अभियंता विजय डी. राहुल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. चार दिवस शेतीला पाणी मिळणार नसल्यामुळे आणि नाबार्ड योजनेअंतर्गत कोट्यवधी रूपयाचे निधी खर्च करण्यात आला. परंतु कालवे फुटण्यामागील कारण शेतकऱ्यांनी संबंधित विभागाला विचारले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Itidah dam main canal split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.