शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

बावनथडी प्रकल्पातून साडेचार हजार हेक्टर सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 5:00 AM

२१ गावांतील साडेचार हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले. यावर्षी प्रकल्पात पुरेसा जलसाठा असल्याने साडेचार हजार हेक्टर सिंचन करणे शक्य झाले. या प्रकल्पाचा लाभ तुमसर तालुक्यातील ८५ गावांना होतो. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी आणि आवश्यकतेनुसार बावनथडी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळेच या हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. धान पिकाला वेळेवर पाणी मिळाल्याने शेतकरी आनंदित होते. यामुळे उत्पन्नातही वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. तुमसर तालुक्यातील २१ गावांतील तब्बल साडेचार हजार हेक्टर सिंचन बावनथडी प्रकल्पाच्या पाण्यावर करण्यात आले. धान पिकासह इतर पिकांसाठी या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर सितेकसा येथे बावनथडी नदीवर आंतरराज्यीय राजीव सागर प्रकल्प आहे. तुमसर, मोहाडी तालुक्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी उन्हाळी हंगामातील पिकासाठी या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. २१ गावांतील साडेचार हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले. यावर्षी प्रकल्पात पुरेसा जलसाठा असल्याने साडेचार हजार हेक्टर सिंचन करणे शक्य झाले. या प्रकल्पाचा लाभ तुमसर तालुक्यातील ८५ गावांना होतो. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी आणि आवश्यकतेनुसार बावनथडी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळेच या हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. धान पिकाला वेळेवर पाणी मिळाल्याने शेतकरी आनंदित होते. यामुळे उत्पन्नातही वाढ झाली.गत ४ मे रोजी तुमसर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बावनथडी प्रकल्पात पाणी सोडले. परिणामी, नळ योजनांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले. तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरत असून आता आगामी खरीप हंगामातील धान नर्सरीसाठी या प्रकल्पाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी आहेत. 

बावनथडी १७.४२ टक्के जलसाठा- बावनथडी प्रकल्पात सद्य:स्थितीत ४४.३७५ दलघमी जलसाठा आहे. या प्रकल्पाच्या एकूण जलसाठ्याचा हा पाणीसाठा १७.४२ टक्के आहे. या प्रकल्पातील क्षमता ३४४.४० मीटर आहे. २३ मे रोजी या प्रकल्पाचा जलस्तर ३३७.१० मीटर होता. प्रकल्पाचे सहाही गेट सध्या बंद आहेत.

यावर्षी उन्हाळी हंगामासाठी नियोजनानुसार सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. आगामी खरीप हंगामात सिंचनासाठी १५ जूननंतर नियोजन करण्यात येईल. -प्रशांत गोडे, कार्यकारी अभियंता,  पाटबंधारे विभाग, भंडारा

 

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प