भंडारा : लाखनी येथील समर्थ विद्यालयातील शालेय पोषण आहाराच्या मालाची अफरातफरीच्या प्रकरणाच्या चौकशीत शिक्षण विभाग दिरंगाई करीत असल्याचा आरोप किशोर कुथे यांनी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कंझुमर्स फेडरेशनद्वारे शाळांना शालेय पोषण आहार व माध्यान्ह भोजन योजनेचा माल पुरविला जातो. समर्थ विद्यालयात दि. १ एप्रिल २०१४ रोजी पोषण आहाराचे मसूर डाळ, जिरे व सोयाबीन तेल सहाय्यक शिक्षक अनिल बावनकुळे यांच्या उपस्थितीत उतरविण्यात आले. किशोर कुथे यांनी शाळेत माल किती उतरविला याबद्दल चौकशी केली. याबद्दल समाधानकारक उत्तर न मिळाले नसल्यामुळे जिल्हा परिषदेकडून शालेय पोषण आहार धान्याची मालाची पोहच पावतीची मागणी केली. यानुसार जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या पावतीनुसार मसूरडाळ, हरबरा, तुरडाळ, मोहरी, जिरे, मिरची पावडर, हळद, आयोडिनयुक्त मिठ, सोयाबीन तेल उतरविल्याची नोंद आहे. पावतीवर पर्यवेक्षक चुटे यांच्या सह्या आहेत. दोन्ही पावत्यामध्ये उचल केल्यामुळे मालाच्या आकडेवारीत फरक असल्यामुळे मुख्याध्यापक व पुरवठादार यांनी संगनमत करुन मालाची अफरातफर केली असल्याचा आरोप कुथे यांनी केला आहे.पोषण आहाराच्या अफरातफरीची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी, जि.प. भंडारा, पंचायत समिती लाखनी व राष्ट्रीय शिक्षण संस्थेकडे केली.सदर प्रकरणाची चौकशी पुर्णत्वास गेली नसून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कुथे यांनी केला आहे. मुख्याध्यापक व पुरवठादारावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा कुथे यांनी दिला आहे. विद्यालयाला पुरविलेल्या तांदळाच्या पोत्याची चौकशी करण्याची मागणी कुथे यांनी केली आहे.े(तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ प्रकरणाचा तपास धिम्यागतीने
By admin | Updated: July 16, 2014 23:57 IST