गोसेखुर्द प्रकल्पबाधित सात गावे रिकामे करण्याचे निर्देश
By Admin | Updated: June 21, 2014 00:58 IST2014-06-21T00:58:07+5:302014-06-21T00:58:07+5:30
यावर्षी आॅक्टोबरमध्ये गोसीखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी वाढविण्याचे काम सुरू होणार

गोसेखुर्द प्रकल्पबाधित सात गावे रिकामे करण्याचे निर्देश
पवनी : यावर्षी आॅक्टोबरमध्ये गोसीखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी वाढविण्याचे काम सुरू होणार असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील तीन व नागपूर जिल्ह्यातील चार असे एकूण सात गाव ४० जूनपुर्वी रिकामे करण्याचे निर्देश सरकारने प्रकल्पग्रस्तांना दिले आहे.
राज्य सरकारने २०१३ मध्ये आॅक्टोबर महिन्यापासून गोसीखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी २३७.७०० मीटर पासून वाढविण्याचा सुरूवात केली होती. पण गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मागण्या सोडविल्याशिवाय जलस्तर वाढविण्याला विरोध करून अनेक आंदोलने केलेत. हे प्रकल्पग्रस्त त्यांना १२०० कोटी रूपयाचे पुनर्वसन अनुदानाचे पॅकेज देण्याचे व त्यांचे पुनर्वसन सन्मानजनकरित्या करण्याची मागणी करीत होते.
शेवटी सरकारने पुर्ण राज्यात फक्त गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना १२०० कोटी रूपयाचे पुनर्वसन पॅकेज देवून त्यांच्या अनेक मागण्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
मागीलवर्षी प्रकल्पग्रस्तांच्या आंदालनामुळे सरकारला धरणाला जलस्तर २३९.२०० मीटरवर स्थिर ठेवून जलस्तर वाढविण्याचे काम थांबवावे लागले. यावर्षी आॅक्टोबर महिन्यापासून गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याच्या संदर्भात वरील अधिकाऱ्यांसह प्रकल्पग्रस्तांच्या दोन तीन सभा संपन्न झाल्या. या सभेमध्ये भंडारा जिल्ह्यातील पाथरी, सावरगाव, जामगाव व नागपूर जिल्ह्यातील जिवनापूर, खराडा, नवेगाव व पांजरेपार असे एकूण ७ गावे ३० जूनपूर्वी पावसाळ्या अगोदर रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासकीय अधिकारी, पुनर्वसन व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष ठेवून आहेत. (तालुका प्रतिनिधी)