पिटेसूर येथील घरकुलांची व विविध कामांची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:32 IST2021-03-08T04:32:42+5:302021-03-08T04:32:42+5:30
जिल्हाधिकारी यांची भेट : सरपंचांनी मांडल्या समस्या जांब (लोहारा) : गरजू ब वंचित नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून ...

पिटेसूर येथील घरकुलांची व विविध कामांची केली पाहणी
जिल्हाधिकारी यांची भेट : सरपंचांनी मांडल्या समस्या
जांब (लोहारा) : गरजू ब वंचित नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्या योजनांचा लाभ नागरिकांनी घेऊन सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी पिटेसूर येथे गावकऱ्यांशी संवाद साधताना केले. तुमसर तालुक्यातील पिपरिया (पिटेसूर) येथे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भेट देऊन विविध कामांची पाहणी करून त्याबद्दलची माहिती जाणून घेतली.
प्रधानमंत्री, रमाई, शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या व बांधकाम सुरू असलेल्या घरकुलाच्या कामाचा संपूर्ण आढावा घेऊन घरकुलच्या कामाची पाहणी केली. यानंतर बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध साहित्यांची पाहणी केली.या माध्यमातुन महिलांनी आर्थिक उन्नती करून आत्मनिर्भर होण्याचे मार्गदर्शन करून गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सरपंच गुरुदेव भोंडे यांनी गावातील विविध विषयांवर जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून समस्या मांडल्या. गावामध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांवर जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले . यावेळी प्रकल्प अधिकारी मनीषा कुळसुंगे, तहसीलदार बी. टी. टेळे, गटविकास अधिकारी धीरज पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक पुरुषोत्तम बिसेन, उपसरपंच राजकुमार ईनवाते, ग्रामसेवक ललित ढोले, तलाठी गणेश धात्रक, गुह अभियंता येळेकर, उमेद अधिकारी शीतल मडावी , ग्रा.पं. सदस्या वीणा चौधरी, ललिता राऊत, उर्मिला शेबरे, शैवला चांदेवार, मंगला गौपाले, गणेश तांडेकर, विक्रांत पटले, राहुल तांडेकर, प्रदीप राऊत, कोतवाल विजय मंडारी, ग्रामपंचायत कर्मचारी, बचत गटाच्या महिला व गावकरी उपस्थित होते.