शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

धान व ऊस पिकांवर किडींचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 5:00 AM

ऊस व धान उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून शासनाने सर्वे करून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. अतीपावसामुळे हलके धानाला कीड लागली आहे. ऊसाला सुद्धा अळ्या लागल्या आहेत. येथील शेतकरी हवलादिल झाला आहे.

ठळक मुद्देतुमसर तालुक्यात ओला दुष्काळाचे सावट : पिकविमा मंजूर करून आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ऊस व धान उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून शासनाने सर्वे करून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. अतीपावसामुळे हलके धानाला कीड लागली आहे. ऊसाला सुद्धा अळ्या लागल्या आहेत. येथील शेतकरी हवलादिल झाला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी बाजार समितीचे संचालक व पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.तुमसर तालुका धान उत्पादकांचा तालुका म्हणून प्रसिध्द आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे. हलक्या धानाच्या शेतात पाणी साचल्याने ते कुजल्यासारखे झाले आहे. काही धान पिकांची दुर्गंधी येत आहे. धानावर किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. ऊसाला सुद्धा किडीने ग्रासल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकºयांवर संकटाची स्थिती ओढावली आहे. ओला दुष्काळासारखी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. शासनाने धान व ऊस पिकांचे सर्वेक्षण करून पंचनामे तयार करावे, शेतकऱ्यांनी पिकांची पिकविम्याची रक्कम मंजूर करून तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.तालुक्यात मागील काही वर्षापासून पाऊस कमी पडत होते. त्यामुळे यावर्षी शेतकºयांनी हलके धानाची लागवड केली, परंतु यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त बरसला. त्याचा फटका धानपिकाला बसला. धान उत्पादक व ऊस उत्पादक शेतकºयांना सध्या आर्थिक मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.कृषी विभागाकडून किटकनाशकांची मागणीभंडारा जिल्ह्यात धान व ऊस पिकांवर किडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकरी कृषीकेंद्रातून महागडी किटकनाशके खरेदी करून पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. पूर्वीच अतीपावसामुळे हलक्या धानाची नासाडी होत आहे. तर दुसरीकडे किडींचा प्रादूर्भाव शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. या अगोदर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून नि:शुल्क किटकनाशके वितरीत करण्यात येत होते. मात्र यावर्षी अद्यापही विभागाकडे किटकनाशके उपलब्ध झालेली नाहीत.

टॅग्स :agricultureशेती