ढगाळ वातावरणाने हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST2020-12-18T05:00:00+5:302020-12-18T05:00:39+5:30
भंडारा जिल्ह्यात धान निघाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी हरभरासह विविध रबी पिकांची लागवड केली आहे. जिल्ह्यात यावर्षी ४ हजार ९६३ हेक्टरवर हरभरा पिकांची लागवड करण्यात आली आहे. पिकही जोमाने वाढत आहे. असे असताना आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी हरभरा पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढल्याचे सर्वत्र दिसत आहे. त्यात घाटेअळी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

ढगाळ वातावरणाने हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदुर : ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर रोगासह अळींचा प्रादुर्भाव वाढला असून घाटेअळीमुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजार हेक्टरवरील हरभरा पीक धोक्यात आले आहे. शेतकरी किडीचे निर्मुलन करण्यासाठी विविध उपाययोजना करताना दिसून येत आहेत.
भंडारा जिल्ह्यात धान निघाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी हरभरासह विविध रबी पिकांची लागवड केली आहे. जिल्ह्यात यावर्षी ४ हजार ९६३ हेक्टरवर हरभरा पिकांची लागवड करण्यात आली आहे. पिकही जोमाने वाढत आहे. असे असताना आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी हरभरा पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढल्याचे सर्वत्र दिसत आहे. त्यात घाटेअळी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत गोंडेगाव येथे चिंतामण तिरमारे यांच्या शेतात शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आला. शेतकऱ्यांनी पिकांच्या सुरक्षिततेसाठी शुन्य खर्चातील पक्षी थांबे लावावे असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांनी केले आहे. ४६ दिवसात हरभऱ्याची शेंडेतोडी करावी, ७० ते ७५ दिवसात फुलोऱ्यावर असताना दुसरी फवारणी करावी असेही त्यांनी सांगितले. पहिली फवारणी निंबोळी अर्काची करावी. दुसरी फवारणी इमामेक्टीन बेंझोएटीची शिफारसीनुसार करावी. त्यामुळे अळींचे नियंत्रण करणे सोपे जाते. नियमीत ढगाळ वातावरणामुळे जमीनीतील ओलावा टिकून राहत असल्याने बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव जाणवत आहे. घाटेअळी आणि इतर किडींचे नियंत्रण शेतकऱ्यांनी वेळीच आणि शिफारसीनुसार केल्यास कीड नियंत्रण शक्य आहे.