शालेय पोषण आहार अफरातफर प्रकरणाची चौकशी सुरु
By Admin | Updated: November 30, 2014 23:00 IST2014-11-30T23:00:06+5:302014-11-30T23:00:06+5:30
स्थानिक समर्थ विद्यालयातील शालेय पोषण आहार योजनेतील धान्याची अफरातफर प्रकरणाचा ‘लोकमत’ने मागोवा घेतला. कारवाईच्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे.

शालेय पोषण आहार अफरातफर प्रकरणाची चौकशी सुरु
लाखनी : स्थानिक समर्थ विद्यालयातील शालेय पोषण आहार योजनेतील धान्याची अफरातफर प्रकरणाचा ‘लोकमत’ने मागोवा घेतला. कारवाईच्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी मुख्याध्यापक कोन्हारे व सहाय्यक शिक्षक महादेव चुटे यांना संशयास्पद घटनांचा खुलासा मागितला आहे.
शालेय पोषण आहार या योजनेअंतर्गत समर्थ विद्यालयात माहे एप्रिल व जून २०१४ या कालावधीत इयत्ता १ ते ५ वी साठी महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह कंझुमर्स फेडरेशन लिमिटेड नागपूर यांचेकडून धान्यादी वस्तुचा पुरवठा करण्यात आलेला होता. शिक्षणाधिकारी कार्यालयाला शालेय पोषण आहार धान्यादी मालाची पोहच पावती प्राप्त झाली आहे. इयत्ता ६ ते ८ साठी पुरवठा करण्यात आला आहे. दोन्ही पावतीवर मुख्याध्यापक, समर्थ विद्यालय लाखनी यांची दोन वेगवेगळ्या स्वाक्षरी पोहचपावतीवर केल्याचे शिक्षणाधिकारी कार्यालयाचे निदर्शनास आले आहे.
शासन आदेशानुसार कोणताही विद्यार्थी आहारापासून वंचित राहु नये, याकरिता शालेय पोषण आहार ही योजना कार्यान्वित करण्यात आले आहे. याची जबाबदारी मुख्याध्यापकावर सोपवली आहे. मुख्याध्यापक जे. आर. कोन्हारे यांचेकडे मुख्याध्यापक पदाच्या संपुर्ण कार्यभार सोपविला होता. त्यांचेकडे शालेय पोषण आहार योजनेची पुर्ण जबाबदारी असतांनी सहाय्यक शिक्षक एम. जे. चुटे यांनी मुख्याध्यापक म्हणून कोणत्या अधिकाराचा वापर करुन धान्यादी मालाची पोहच पावतीवर कशी काय स्वाक्षरी केली.
याबाबत खुलासा मागितला आहे. माहे एप्रिल व जून २०१४ चे धान्यादी मालाचे पोहच पावतीवर मुख्याध्यापक यांचे दोन वेगवेगळ्या स्वाक्षऱ्या कोणत्या आदेशाद्वारे करण्यात आलेल्या आहेत. याबाबत खुलासा करण्याचे पत्र शिक्षणाधिकारी यांनी दिले आहे.
मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांचे आदेशान्वये शालेय पोषण आहारात अनियमितता केल्यामुळे १० हजार रुपये वसुल करण्याचे आदेश असतांना दंड भरणा केल्याची पावती कार्यालयास प्राप्त झालेली नसल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी स्पष्ट केले आहे.(तालुका प्रतिनिधी)