शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा राक्षस झाला जागा! गॅस सिलिंडर 1025 रुपयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

कोरोनामुळे आधीच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात केली आहे. अशात पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असून, महिन्याचे बजेट सांभाळताना नाकीनऊ येत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनामुळे आधीच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात केली आहे. अशात पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सुरुवातीला ४०० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता १,०२५ रुपये मोजावे लागत आहेत.यामुळे महिनाभराच्या खर्चाचा ताळमेळ जुळविताना चांगलीच दमछाक होत आहे. पाच राज्यांतील निवडणुका आटोपताच केंद्र सरकारने गॅस सिंलिडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरापूर्वी ९७० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता १,०२५ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. वाढत्या महागाईने खर्चाची जुळवाजुळव करताना तारांबळ उडत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाईत सातत्याने वाढ होत असून, सर्वसामान्यांना महिन्याचे बजेट सांभाळताना चांगलेच नाकीनऊ येत आहे. वाढती इंधन दरवाढीने गृहिणींचे बजेट बिघडविताना दिसून येत आहे.

सबसिडी नावालच 

- गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पण, त्यावर दिल्या जाणाऱ्या सबसिडीलासुध्दा कात्री लावली जात आहे. ९७५ रुपये मोजल्यानंतर ४३ रुपयांची सबसिडी मिळत आहे. - सुरुवातीला गॅस सिलिंडरवर दीडशे रुपयांपर्यंत सबसिडी दिली जात होती. मात्र, आता त्यात सातत्याने कपात केली जात आहे. - वर्षभराच्या कालावधीत गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास ४५० रुपयांची वाढ झाली, तर सबसिडी मात्र ४३ रुपयांवर आली आहे. 

 केवळ गॅस सिलिंडरसाठी हजार रुपये कसे परवडतील? 

वाढत्या महागाईमुळे गृहिणींचे बजेट आधीच बिघडले आहे. त्यातच आता गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात असल्याने पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ आली आहे. उत्पन्न स्थिर असून, महागाई मात्र सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने किमान गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची गरज आहे.- प्रियंका सार्वे, गृहिणी

कोरोनामुळे आधीच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात केली आहे. अशात पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असून, महिन्याचे बजेट सांभाळताना नाकीनऊ येत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.- दिक्षा साखरे, गृहिणी 

चूल पेटविता येईना, गॅस परवडेना - शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले. मात्र, गॅस सिलिंडर भरण्यासाठी गोरगरीब लाभार्थ्यांना १,०२५ रुपये आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने गृहिणींना महिन्याचे बजेट सांभाळताना चांगलीच कसरत करावी लागते.