जनावरांना आजाराची लागण
By Admin | Updated: August 16, 2014 23:19 IST2014-08-16T23:19:12+5:302014-08-16T23:19:12+5:30
लाखनी तालुक्यातील घोडेझरी येथे जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण नसून जीवाणूजन्य रोगाची लागण झाली आहे.बाधीत जनावरांना योग्य उपचाराकरीता जिल्हा पशुचिकित्सक चमूला आदेश दिले

जनावरांना आजाराची लागण
पाळीव जनावरांचा मृत्यू : पशुपालकांमध्ये भीतीचे सावट
ंपालांदूर: लाखनी तालुक्यातील घोडेझरी येथे जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण नसून जीवाणूजन्य रोगाची लागण झाली आहे.बाधीत जनावरांना योग्य उपचाराकरीता जिल्हा पशुचिकित्सक चमूला आदेश दिले असून शेतकऱ्यांनी पशुुचिकित्सकांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. एम.एम.शहारे यांनी केले.
डॉ. शहारे यांनी घोडेझरी येथे भेट देऊन जनावरांची तपासणी करुन प्राथमिक अंदाजात गुरांना संमिश्र जीवाणूजन्य रोगाची लागण झाल्याचे सांगितले. मृत जनावरांना खोल खड््यात पुरुन स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले.
गुरे बांधण्याच्या ठिकाणी रोगप्रतिबंधक औषधी फवारणी करीता तात्काळ आदेश देण्यात आले. कृषी पशुसंवर्धन सभापती संदीप ताले यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकून आकस्मिक निधीतून शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले.(प्रतिनिधी)