शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

जिल्हा वार्षिक योजना निधी मर्यादेत विदर्भावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:52 AM

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत राज्य शासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या निधी मर्यादेत विदर्भावर अन्याय केला असून पश्चिम महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे झुकते माप दिले आहे.

ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्राला झुकते माप नंदूरबार व भंडारा जिल्ह्यांना सर्वात कमी

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत राज्य शासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या निधी मर्यादेत विदर्भावर अन्याय केला असून पश्चिम महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे झुकते माप दिले आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी १९६९ .८५ कोटी रूपयांची मर्यादा ठरवून सापत्न वागणूक दिली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील केवळ पाच जिल्ह्यांसाठी १५८९.६० कोटी एवढी भरीव निधी मर्यादा आहे. विशेष म्हणजे नंदुरबार आणि भंडारा जिल्ह्यांच्या वाट्याला आलेली निधी मर्यादा राज्यात सर्वात कमी आहे.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा दरवर्षी तयार केला जातो. त्यात विविध विकास कामांचा समावेश असतो. जिल्ह्यातील समस्या आणि जिल्ह्याची गरज पाहून कोणत्या योजनांवर किती खर्च करावयाचा याचे नियोजन केले जाते. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या माध्यामातून हा वार्षिक योजनांचा आराखडा प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला जातो. २०१९-२० च्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) तयार करण्यासाठी शासनाने कमाल नितव्यय मर्यादा ठरवून दिली आहे. राज्यातील संपूर्ण ३६ जिल्ह्यांसाठी ही मर्यादा ७३५२.३० कोटी रुपये आहे. जिल्हा निहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास मागास विदर्भावर निधी मर्यादेतही अन्याय झाल्याचे दिसून येते.विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी १९६९ कोटी ८५ लाख रूपयांची कमाल मर्यादा आहे. त्यात नागपूर जिल्हा २३४.८८ कोटी, वर्धा १०७.५७ कोटी, भंडारा ९१.४६ कोटी, चंद्रपूर १७५.७४ कोटी, गडचिरोली १४५.३२ कोटी, गोंदिया १०५.२७ कोटी, अमरावती २१२.८६ कोटी, अकोला १२१.९२ कोटी, यवतमाल २३०.९२ कोटी, बुलढाणा २१०.१३ कोटी, वाशिम १०२.८६ कोटी रूपयांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा ५०५.७६ कोटी, सातारा २५६.८६ कोटी, सांगली २२४.१७ कोटी, सोलापूर ३३९.७७ कोटी, कोल्हापूर २४३.०४ कोटींच्या निधी मर्यादेचा समावेश आहे.मागास विदर्भाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे नेहमी सांगितले जाते. विदर्भाच्या विकासासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही असे मुख्यमंत्र्यापासून वित्त मंत्र्यांपर्यंत सर्वच जण सांगतात. मात्र जिल्हा वार्षिक योजना तयार करण्यासाठी ठरवून दिलेल्या कमाल नितयव्यय मर्यादेने विदर्भाच्या विकासाला कशी चालना मिळणार असा प्रश्न आहे.

लहान जिल्ह्यांकडे दुर्लक्षच्राज्यातील लोकसंख्या आणि विस्ताराने लहान जिल्ह्याकडे जिल्हा वार्षिक योजना कमाल निधी मर्यादेत दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. नंदुरबार जिल्ह्याला केवळ ६७.५५ कोटींची कमाल निधी मर्यादा ठरवून दिली असून ती राज्यात सर्वात कमी आहे. त्या खालोखाल भंडारा ९१.४६ कोटी, सिंधुदुर्ग ९२.१८ कोटी, हिंगोली ९८.७४ कोटी रूपयांची मर्यादा आहे. याचा परिणाम विकास योजनांचा कृती आराखडा तयार करताना होणार असून पर्यायाने जिल्ह्यांच्या विकासावर होणार आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ