भंडारा बसस्थानकात लालपरी चालकांंचा बेशिस्तपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:38 IST2021-08-27T04:38:09+5:302021-08-27T04:38:09+5:30
एसटी महामंडळ हे वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठे महामंडळ आहे. त्यातच प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. मात्र काही ...

भंडारा बसस्थानकात लालपरी चालकांंचा बेशिस्तपणा
एसटी महामंडळ हे वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठे महामंडळ आहे. त्यातच प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. मात्र काही एसटीचे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
कोट
प्रवाशांची प्रतिक्रिया
ग्रामीण भागातील बसफेऱ्या वेळेत सुटत नसल्याने आम्हाला ताटकळत थांबावे लागते. वारंवार बसची चौकशी करायला गेल्यास अधिकारी उद्धटपणाची वागणूक देतात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
संदीप मेश्राम, प्रवासी
मी एक वृद्ध नागरिक आहे. मला पवनीला जायचे आहे. पण अजून बस आलेली नाही. पवनी मार्गावर नेहमीच गर्दी असते. त्यामुळे ज्यादा बसेस सोडण्याची गरज आहे.
शिवराम वाडीभस्मे, प्रवासी
बॉक्स
स्वच्छतेला प्राधान्य हवे...
भंडारा बसस्थानकातील खड्ड्यात पाणी साचले असून, येथे अस्वच्छता वाढली आहे. याचा प्रवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासोबतच बसस्थानकात स्वच्छता नसल्याचीही प्रवाशांची ओरड आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास होत असतानाही याकडे बसस्थानक प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे.
बॉक्स
चालकांसह प्रवाशांना पाठदुखीचा त्रास...
भंडारा बसस्थानकात प्रवेशद्वारावरच मोठमोठे खड्डे पडले आहेत. यासोबतच एका बाजूने बस आत प्रवेश करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडेपर्यंत असंख्य खड्डे आहेत. हे खड्डे इतके मोठे आहेत की यातूनच बसेस आदळतात. त्यामुळे एसटी चालकांसह प्रवाशांनाही पाठदुखीचा त्रास होत आहे. या खड्ड्यांची दुरुस्ती करावी व खड्ड्यांतून प्रवाशांसह चालकांची मुक्तता करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. अनेक दिवसांपासूनचे हे खड्डे भंडारा बसस्थानक प्रमुखांना दिसत नाहीत का, अशीही ओरड होत आहे.