सुट्टीवर गावी आलेल्या इंडाे तिबेटियन बाॅर्डर फाेर्स जवानाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST2021-01-04T04:29:31+5:302021-01-04T04:29:31+5:30

राहुल वामन गायधने (वय २७, रा. टांगा) असे मृतांचे नाव आहे. ते ३० डिसेंबर राेजी दाेन महिन्यांची सुट्टी घेऊन ...

Inda Tibetan Border Fires jawan killed while on holiday in the village | सुट्टीवर गावी आलेल्या इंडाे तिबेटियन बाॅर्डर फाेर्स जवानाचा मृत्यू

सुट्टीवर गावी आलेल्या इंडाे तिबेटियन बाॅर्डर फाेर्स जवानाचा मृत्यू

राहुल वामन गायधने (वय २७, रा. टांगा) असे मृतांचे नाव आहे. ते ३० डिसेंबर राेजी दाेन महिन्यांची सुट्टी घेऊन आपल्या गावी आले हाेते. ३१ डिसेंबर राेजी त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना माेहाडी येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृतीत फरक जाणवला नाही. त्यामुळे त्यांना भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी औषधोपचार केले. दरम्यान, शनिवारी सकाळी ६.३० वाजता ते शाैचालयात गेले. बराच वेळ परत आले नाही म्हणून वडिलांनी आवाज दिला. प्रतिसाद मिळत नसल्याने शाैचालयाचे दार ताेडले तेव्हा राहुल बेशुद्धावस्थेत पडून हाेते. त्यांंना तत्काळ माेहाडी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घाेषित केले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त हाेत आहे.

Web Title: Inda Tibetan Border Fires jawan killed while on holiday in the village