पट्टा पद्धत लागवडीकडे वाढला शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:01 IST2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:01:09+5:30

भंडारा तालुक्याअंतर्गत दोन हजार हेक्टर क्षेत्रावर पट्टा पद्धतीची लागवड झाली आहे. तालुक्यातील परसोडी ५० हेक्टर, खमारी ७५ हेक्टर, माटोरा २६ हेक्टर, आमगाव ३३ हेक्टर, टेकेपार २३ हेक्टर, गणेशपूर १३ हेक्टर, भंडारा १९ हेक्टर, कोंढी २७ हेक्टर, साहुली १३ हेक्टर, शहापूर २७ हेक्टर, मोहदूरा २३ हेक्टर, जाख ३२ हेक्टर, भिलेवाडा २३ हेक्टर, कोथुर्णा मुख्यालयात २९ हेक्टर क्षेत्रात धान लागवड झाली आहे.

Increased tendency of farmers towards lease method cultivation | पट्टा पद्धत लागवडीकडे वाढला शेतकऱ्यांचा कल

पट्टा पद्धत लागवडीकडे वाढला शेतकऱ्यांचा कल

ठळक मुद्देभंडारा तालुक्यात दोन हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड, कीडरोग नियंत्रणासाठी ठरतेय फायदेशीर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धान पिकावर विविध रोगांचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पट्टा पद्धतीने धान लागवड पद्धतीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल यावर्षी वाढला आहे. सुधारित व तांत्रिक पद्धतीने शेती केल्यास कमी खर्चा भरघोस उत्पादन मिळते ही बाब हेरून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पट्टा पद्धतीने धानाची लागवड केली आहे.
भंडारा तालुक्याअंतर्गत दोन हजार हेक्टर क्षेत्रावर पट्टा पद्धतीची लागवड झाली आहे. तालुक्यातील परसोडी ५० हेक्टर, खमारी ७५ हेक्टर, माटोरा २६ हेक्टर, आमगाव ३३ हेक्टर, टेकेपार २३ हेक्टर, गणेशपूर १३ हेक्टर, भंडारा १९ हेक्टर, कोंढी २७ हेक्टर, साहुली १३ हेक्टर, शहापूर २७ हेक्टर, मोहदूरा २३ हेक्टर, जाख ३२ हेक्टर, भिलेवाडा २३ हेक्टर, कोथुर्णा मुख्यालयात २९ हेक्टर क्षेत्रात धान लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी पुढाकार घेत धान लागवडीसाठी मार्गदर्शन घेतले आहे.
प्रत्यक्ष पीक लागवड करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दाखविल्याने पट्टापद्धत क्षेत्रात वाढ झाली आहे. धान रोवणी केल्यानंतर कीड व्यवस्थापन रासायनिक खताचे योग्यवेळी मात्रा रोगाचा प्रादूर्भाव झाल्यास फवारणी करणे तसेच मशागतीसाठी रोवणीच्या बांधीत काही विशिष्ट अंतरावर मोकळी जागा ठेवल्यास शेतीसाठी फायदेशीर ठरते, असे कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, योगेश वासनिक यांनी सांगितले. तालुक्यात सोयाबीनमध्ये यंदा वाढ झाली असून २२५ हे. क्षेत्रावर तर फळबाग लागवड ६० हे.क्षेत्रावर झाली असून शेतकरी आधुनिक पद्धतीकडे वळल्याचे दिसून येत आहे.

असे आहेत फायदे
पट्टा पद्धतीत १० ते १५ फुटावर एक ते दीड फुटाची लांब रेषेत जागा सोडली जाते. रोपांना अधिक फुटवे फुटतात. त्यामुळे तुडतुडे व अन्य रोगावर नियंत्रण आणता येते. पिकाच्या मुळापर्यत थेट सूर्य प्रकाश मिळत असल्याने हवा खेळती राहते. पिकाची पाहणी, विविध रोगाचे निरिक्षण करणे सोयीचे ठरते. भरपूर सूर्यप्रकाश मिळत असल्याने पूर्व पश्चिम दिशेत पट्टा पद्धत फायदेशिर असल्याचे भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी सांगितले.

Web Title: Increased tendency of farmers towards lease method cultivation