दुधात भेसळीचे वाढतेय प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:08 IST2018-10-26T22:08:16+5:302018-10-26T22:08:43+5:30
तालुक्यातील पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहेत. मात्र कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात शेतकऱ्यांसह व्यापारीसुध्दा दुधात वेगवेगळे पदार्थ भेसळ करुन विक्री करीत आहेत.

दुधात भेसळीचे वाढतेय प्रमाण
लोकमत न्यूज नेटवर्क
पालोरा : तालुक्यातील पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहेत. मात्र कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात शेतकऱ्यांसह व्यापारीसुध्दा दुधात वेगवेगळे पदार्थ भेसळ करुन विक्री करीत आहेत. याचा विपरित परिणाम मानवी जीवनाच्या आरोग्यावर पडत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नुकताच कोजागिरीच्या कार्यक्रम पार पडला आहे. रात्रीच्या चांदण्यात दुध पिणे आरोग्यदायी मानले जाते. मात्र हेच दुध भेसळयुक्त असल्याने मानवी जीवनाच्या आरोग्यावर विपरित परिणाम पडत आहे.
हे बोलके चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तालुक्यात प्रत्येक दिवसाला २० ते २५ हजार लिटर दुधाची गरज असते.
ज्याप्रसंगी शेतकऱ्यांना जनावरांच्या वैरणाची कमतरता भासत आहेत. दुधाची मागणी जास्त प्रमाणात असल्याने याचाच फायदा म्हणून दुधात भेसळ केल्या जाते. दुधात भेसळ लक्षात येऊ नये म्हणून दुग्ध व्यापारी वर्ग नानाविधी युक्त्या वापरल्या जातात.
अशी केली जाते दुधात भेसळ
दुधाचे संकलन वाढविण्याची दुधात पाणी मिसळविले जाते. यासोबतच आरारुट पावडर, मालटोल, मक्यापासून बनविलेले पावडर, मिठ आणि अधिक दुधासाठी जनावरांना इंजेक्शन दिले जाते. या पद्धतीचा अवलंब केल्याने दुधात पाणी टाकेल तरी दूध घट्ट दिसते. मात्र यामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम पडत आहे. पालोरा परिसरात अनेक अवैधरीत्या दुग्ध व्यवसाय करणारे आहेत. यांच्यावर कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. दुधात भेसळ ओळखण्याकरिता संबंधित विभागाध्यक्ष यांना देण्यात आली. मात्र या मशीनी फक्त शोभेच्या वस्तू ठरत आहे.
मिठाई बनविण्यासाठी होतोय वापर
पालोरा, लोणारा, कुर्ला परिसरातून हजारो लिटर दुध दररोज कोंढा येथे पाठविल्या जाते. कोंढा येथे आलेल्या बाहेर देशातून आलेले काही व्यापारी गोड पदार्थाचा वापर करतात. यांना दुग्ध संकलन केंद्रातून दररोज हजारो लिटर दुध पुरवठा केला जातो. हा दुध पुर्णपणे भेसळ असून व्यापाऱ्यांना अल्प दरात विकला जातो. यामुळे दुग्धव्यवसायीक व मिठाई विक्रेते मालामाल होत आहेत. मात्र शेतकऱ्यांना भाव अल्पप्रमाणात मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आपले जनावरे विक्रीला नेत आहे. दुधात भेसळ करणारे जेवढे व्यापारी जबाबदार आहेत तेवढेच वरिष्ठ अधिकारी सुध्दा जबाबदार आहेत.