शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
4
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
5
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
6
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
7
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
8
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
9
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
10
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
11
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
12
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
14
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
15
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
16
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
17
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
18
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
19
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
20
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..

जिल्ह्यात सहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:39 IST

दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील सहा हजार ६४८ दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने ४९ विशेष शिक्षकांची नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्दे४९ विशेष शिक्षक : शारीरिक, मानसिक आणि दृष्टिबाधितांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील सहा हजार ६४८ दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने ४९ विशेष शिक्षकांची नियुक्ती केली आहे. शारीरिक, मानसिक, श्रवणदोष आणि दृष्टीबाधीतांना सामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण दिले जात आहे.भंडारा जिल्ह्यात सहा हजार ६४८ अक्षमता असलेले विद्यार्थी आढळून आले आहे. हे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबतच शिक्षण घेत आहेत. २०१८-१९ मध्ये महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेने या विद्यार्थ्यांसाठी ५२ शिक्षकांच्या नियुक्तीला मंजूरी दिली होती. सध्या ४९ विशेष शिक्षक कार्यरत आहेत. हे शिक्षक मानसिक, शारीरिक अक्षमता, श्रवणदोष आणि दृष्टीबाधीत विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. जिल्ह्यातील सात तालुक्यात असलेल्या विविध शाळांमध्ये हे विद्यार्थी शिक्षण घेत असून त्या शाळांवर जावून शिक्षक त्यांना शिकवित आहेत. अंध विद्यार्थ्यांसाठी बे्रल लिपी पाठ्यपुस्तकांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्तर चांगलाच सुधारित आहे. यासोबतच पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रतिमाह २५० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. एकंदरीतच या विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड काढून त्यांना सर्व समावेशित शिक्षण दिले जात आहे. या विद्यार्थ्यांना बे्रेल कीट, व्हिल चेअर, ट्रायसिकल, श्रवणयंत्र, बॅटरी संच, डिजीप्लेअर, कॅलीअर आदींचे वितरण करण्यात आले आहे.सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन दिले जात आहे. यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना सहाय्यता भत्ता परिवहन भत्ता, आणि दहा महिन्यासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे.-विलास गोंदोळे, जिल्हा समन्वयक समावेशित, शिक्षण जिल्हा परिषद, भंडारा

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी