धान खरेदी केंद्राचे लाखांदूर येथे थाटात उद्घाटन.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:33 IST2021-02-12T04:33:24+5:302021-02-12T04:33:24+5:30
लाखांदूर : यशोदीप बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेचे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे लाखांदूर येथे थाटात उद्घाटन पार पडले. उद्घाटनप्रसंगी ...

धान खरेदी केंद्राचे लाखांदूर येथे थाटात उद्घाटन.
लाखांदूर : यशोदीप बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेचे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे लाखांदूर येथे थाटात उद्घाटन पार पडले. उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून रमेश भैया, अध्यक्षस्थानी नरेश दिवटे, विशेष अतिथी म्हणून काँग्रेस कमिटी अध्यक्ष वासुदेव तोंडरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप बुराडे, गटनेते रामचंद्र राऊत, विकास वासेकर, सूरज घरडे, मोहन सोनकुसरे, अनिल तोंडरे, सचिन मेंढे, चोपराम नाकतोडे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये केंद्रावर प्रथम धान विक्रीसाठी आणणारे शेतकरी म्हणून बाळकृष्ण ठेंगरी यांचे संस्थेच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत मेश्राम, सचिव बळीराम मेश्राम, सदस्य सुरेश खत्री, विनोद भुते, अमर कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.