दामिनी पथकाचे उद्घाटन
By Admin | Updated: March 9, 2016 01:34 IST2016-03-09T01:34:08+5:302016-03-09T01:34:08+5:30
पोलीस मुख्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक वनिता साहु यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनानिमित्त दामिनी पथकाचे उद्घाटन करण्यात आले.

दामिनी पथकाचे उद्घाटन
भंडारा : पोलीस मुख्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक वनिता साहु यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनानिमित्त दामिनी पथकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वनिता साहु यांनी कार्यक्रमाला उपस्थित महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आजची महिला ही पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते, शिक्षण घेणे हा मुलींचा हक्क आहे. आपण आपल्या मुलीला उच्च शिक्षणाची संधी देवून उच्च पद प्राप्त करण्यास प्रेरणा दिली पाहिजे, असे मार्गदर्शन केले.
दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा या करीता राज्यात दामिनी पथक निर्माण केलेले आहे. दामिनी पथकासाठी महिला पोलीस कर्मचारी नेमून पेट्रोलींगकरीता दोन मोटर सायकल व एक चार चाकी वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली असून नेमलेल्या कर्मचारी महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा यासाठी पेट्रोलिंग करणार आहेत.
यावेळी दामिनी पथकाच्या आयोजनाबद्दल उपनिरिक्षक ललीता तोडासे, महिला सेल येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमामध्ये प्रभारी उपअधीक्षक राऊत, प्रशांत कोलवाडकर, लोळे, पोलीस अधिकारी, कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)