मद्यपी पतीच्या त्रासातून सुटकेसाठी महिलेने शेतशिवारात घेतला गळफास 

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 26, 2024 18:32 IST2024-05-26T18:32:42+5:302024-05-26T18:32:48+5:30

घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

In Bhandara, a married woman committed suicide after being tortured by her husband | मद्यपी पतीच्या त्रासातून सुटकेसाठी महिलेने शेतशिवारात घेतला गळफास 

मद्यपी पतीच्या त्रासातून सुटकेसाठी महिलेने शेतशिवारात घेतला गळफास 

भंडारा: नेहमी मद्यधुंद राहणाऱ्या पतीच्या त्रासामुळे मानसिक तणावात राहणाऱ्या एका विवाहितेने शेतातील झाडाला गळफास बांधून आत्महत्या केली. छबू गुरुदास कावळे (वय ४०) असे या महिलेचे नाव असून ती पवनी तालुक्यातील कुर्झा या गावची आहे.

२५ मे च्या सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शेतशिवारातील सागाच्या झाडाला तिचा मृतदेह फासावर लटकलेला आढळून आला. पोलिसांच्या तपासानुसार, तिचा पती गुरुदास हा नेहमी दारूच्या नशेत असायचा. त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. यातूनच तिने हे पाऊल उचलल्याची नोंद पवनी पोलिसांनी आपल्या अहवालात केली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पुढील तपास पोलिस हवालदार दुर्योधन वकेकार करीत आहेत.

Web Title: In Bhandara, a married woman committed suicide after being tortured by her husband