लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात खरीप २०२५ साठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना लागू झाली असली, तरी नव्या नियम आणि कडक अटींमुळे शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात घटला आहे. यंदा केवळ ९१,४५४ शेतकरी या योजनेत सहभागी झाले. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २२,२५३ नी कमी आहे. वाढलेला विमा हप्ता आणि जोखीम कव्हरेजमधील कपात ही या घटीमागची प्रमुख कारणे मानली जात आहेत. अंतिम नोंदणीची मुदत १४ ऑगस्टपर्यंत होती.
विमा भरपाईचा इतिहासगतवर्षी ६४.८८ लाख रुपये भरपाई देण्यात आली होती. शेतकऱ्यांचा मागील अनुभव चांगला असला तरी यावर्षी कमी सहभागाचे कारण म्हणजे स्वतः भरायची वाढलेली रक्कम आणि कव्हरेजमध्ये कपात करण्यात आली आहे.
यावर्षी प्रमुख बदलःशेतकऱ्याने स्वतः भरायचा विमा हप्ता (प्रतिहेक्टर) :धान : ५१२.५० रुपये प्रति हेक्टरसोयाबीन : ९०.६३ रुपये प्रति हेक्टरअतिवृष्टी, गारपीट, पूर, कीडरोग, काढणीनंतरची हानी अशा जोखीमांचा कव्हरेज रद्द.
मुख्य मुद्देःयंदाचा सहभागः १३ ऑगस्टपर्यंत९१,४५४ शेतकऱ्यांनी विमा घेतला.मागील वर्षाचा सहभाग : २०२४मध्ये १,१३,७०७ शेतकरी सहभागी होते.घट : यंदा २२,२५३ शेतकऱ्यांची घट.विमा क्षेत्रफळः ३८,९१६ हेक्टर.शेवटची तारीख: १४ ऑगस्ट २०२५.
"योजनेच्या सुधारित मॉडेलमुळे शेतकऱ्यांना उत्पादनावर आधारित योग्य विमा संरक्षण मिळेल व हवामानाच्या अनिश्चिततेमुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होईल."- संगीता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.