बिघडले हस्ताक्षर आणि मंदावली लिहिण्याची गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST2021-03-29T05:00:00+5:302021-03-29T05:00:40+5:30
लाॅकडाॅऊन काळात झालेल्या टाळेबंदीचा परिणाम म्हणून अगदी पहिल्या वर्गापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्वच वर्ग ऑनलाईन सुरु झाले. एव्हाना विद्यापिठाच्या परीक्षाही ऑनलाईन सुरु आहेत. आता याचा परिणाम अक्षर साधनेत दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय प्रचंड प्रमाणात कमी झाल्याने त्यात बदल जाणवू लागला आहे. एकाने लिहावे तर दुसऱ्याने वाचनेही कठीण आहे, असे घडत आहे.

बिघडले हस्ताक्षर आणि मंदावली लिहिण्याची गती
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेना संकटकाळात शाळा, महाविद्यालय बंद हाेती. याचा फटका आता विद्यार्थ्यांना हस्ताक्षर व लिखाणाच्या माध्यमातून समाेर येवू लागला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे लिहिण्याची सवय तुटल्यामुळे हस्ताक्षर आणि लिहिण्याची गती मंदावल्याचे दिसून येत आहे.
लाॅकडाॅऊन काळात झालेल्या टाळेबंदीचा परिणाम म्हणून अगदी पहिल्या वर्गापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्वच वर्ग ऑनलाईन सुरु झाले. एव्हाना विद्यापिठाच्या परीक्षाही ऑनलाईन सुरु आहेत. आता याचा परिणाम अक्षर साधनेत दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय प्रचंड प्रमाणात कमी झाल्याने त्यात बदल जाणवू लागला आहे. एकाने लिहावे तर दुसऱ्याने वाचनेही कठीण आहे, असे घडत आहे.
मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात...
ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना रेडीमेड मटेरियल उपलब्ध करुन द्यावे लागते. प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या व प्रेरित करणाऱ्या घडामाेडींचा आभासी शिक्षणात समावेश करावा लागताे. ऑनलाईन शिक्षणात लिहिण्याची कुठलीही पध्दत नसल्याने त्याचा परिणाम लिखाणावर हाेणे साधारण बाब आहे. त्यामुळे लिखाणाची सवय अविरत राहणे गरजेचे आहे.
- ममता राऊत, प्राध्यापिका
मराठी विभाग, जे.एम. पटेल महाविद्यालय, भंडारा
ज्या घारात आई-बाबा दाेघेही कमावते असतात, त्या घरात विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष देणारे नसल्यामुळे लिखाण व वाचन याकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून आले आहे. आधीच नविन पिढी इंग्रजी भाषेच्या आक्रमणामुळे मातृभाषेला मुकत आहे.
शाळा सुरु झाल्यानंतर ऑनलाईनमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरे लिहिण्याची गती मंदावत असल्याचे दिसून येते. अक्षरे लिहिण्याचा सराव कमी झाल्याने भविष्यात परिणाम जाणवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षेच्या ऐन ताेंडावर हे नविनच संकट उभे ठाकले आहे.
पालकांचे मत...
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची साेय झाली असली तरी आदी ज्या परीने परीक्षांची तयारी करवून घेतली जायची त्यात बदल जाणवत आहे.
- सत्यवान पेशने, पालक
ऑनलाईन शिक्षणात शिक्षकांचा धाक नसल्याचे दिसून येते. त्यामुळेही विद्यार्थी गण अक्षर साधनेकडे दुर्लक्ष करतात. लिहीने व वाचने ही मुळत: अनन्यसाधारण बाब आहे.
- मनाेज दलाल, पालक