पुढील काळात रक्तदान मोहिमेवर परीणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST2021-04-24T04:35:57+5:302021-04-24T04:35:57+5:30
लाखांदूर : कोणती जयंती असो , की एखादा सण आला तर तालुक्यातील कुठल्या ना कुठल्या गावी रक्तदान शिबिराचे आयोजन ...

पुढील काळात रक्तदान मोहिमेवर परीणाम
लाखांदूर : कोणती जयंती असो , की एखादा सण आला तर तालुक्यातील कुठल्या ना कुठल्या गावी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते व त्यामधून शेकडो रक्तदात्यांकडून रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले जाते. मात्र पुढील महिन्यापासून १८ वर्षावरील सर्वांनाच लसीकरण केले जाणार असल्याने रक्तदानाचा यज्ञ मात्र विस्कळीत होऊन पुढील काळात रक्तदान मोहिमेवर परिणाम पडणार असल्याचे सुज्ञ जाणकार बोलून दाखवत आहेत.
तालुक्यात सर्वत्रच कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून तालुक्यात एकही गाव कोरोनामुक्त नाही. कोरना रुग्णांच्या प्रतिबंधासाठी शासनाच्या आरोग्य विभागाअंतर्गत लसीकरण मोहीम हाती घेतली असून अनेकांनी लसीकरणदेखील केल्याची माहिती आहे. राज्यात लसीकरणात भंडारा जिल्हा अव्वल असल्याची माहिती आहे.
डायलिसीस, रक्ताचा कर्करोग, विविध प्रकारच्या शेकडो शस्त्रक्रिया, अपघातातील गंभीर जखमी अशा रुग्णांसाठी दररोज मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज लागते. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे रक्तदान करण्यास करण्यास पुढे येण्यास अनेकजण धजावत नाहीत.
परीणामी गेल्या वर्षभरापासून सर्वत्रच रक्ताचा मोठा तुटवडा जाणवू लागला असल्याचे वृत्त आहे.
केंद्र शासनाने येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लढाईला बळ मिळणार आहे मात्र लस घेतल्यानंतर किमान २८ दिवस रक्तदान करण्यास वैद्यकीय नियमानुसार मनाई करण्यात आली आहे. १ मेपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर रक्तदात्यांमध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वत्रच रक्त तुटवड्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशा भीती या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती करीत आहेत.