मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा
By Admin | Updated: November 1, 2014 00:44 IST2014-11-01T00:44:46+5:302014-11-01T00:44:46+5:30
जाधव परिवारावर भ्याड हल्ला करून तिहेरी हत्याकांड घडविले. यातील आरोपींना तत्काळ अटक करून अॅक्ट्रासीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, ..

मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा
साकोली : जाधव परिवारावर भ्याड हल्ला करून तिहेरी हत्याकांड घडविले. यातील आरोपींना तत्काळ अटक करून अॅक्ट्रासीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले पक्षातर्फे राज्यपाल यांना निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन तहसील कार्यालयामार्फत पाठविण्यात आले आहे.
या निवेदनानुसार, २० आॅक्टोबरला जाधव परिवारावर भ्याड हल्ला करून तिहेरी हत्याकांड काही समाजकंटकांनी घडविले असून या घटनेचा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले पक्षातर्फे निषेध करण्यात आला. तसेच मृतक जयश्री जाधव, संजय जाधव व सुनील जाधव रा. जयखेडे जि. अहमदनगर यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करून त्यांचेवर अॅक्ट्रासिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे. अहमदनगर जिल्ह्याला अत्याचार प्रवण जिल्हा घोषित करण्यात यावा आणि अनुसूचित जातीला पोलीस संरक्षण पुरविण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन घोडीचोर, दिलीप बोरकर, कैलास गेडाम, नितीन ईलमकर, मोहन बोरकर, दुधराम उईके, विजय रामटेके, संतोष पुरामकर व अशोक कोटांगले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)