बोथली-खोलमारा-तावशी घाटावरून रेतीची अवैध तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:18+5:30

वाळू तस्करी जोमात सुरू आहे. बोथली, खोलमारा, तावशी, मांढळ आदी घाटावरून राजरोसपणे वाळू वाहतूक सुरू असली तरी मात्र या तस्करावर कोणतीही कार्यवाही होत नाही. उलट येथील तलाठी वाळू तस्करासोबत खुलेआम फिरत असल्याने कार्यवाही करणार कोण, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Illegal smuggling of sand from Bothali-Golmara-Tawashi Ghat | बोथली-खोलमारा-तावशी घाटावरून रेतीची अवैध तस्करी

बोथली-खोलमारा-तावशी घाटावरून रेतीची अवैध तस्करी

ठळक मुद्देनदी पात्र ठरले ओस : महसूल विभागाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : गत काही दिवसांपासून नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाला असून पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे नदीचे पात्र ओस पडले आहे. रेतीची तस्करी करणाऱ्यास कोणतीही अडचण होत नसल्याने वाळु माफीयांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताने आपला मोर्चा नदी घाटावर रात्रीबेरात्री चढविला आहे. वाळू तस्करी जोमात सुरू आहे. बोथली, खोलमारा, तावशी, मांढळ आदी घाटावरून राजरोसपणे वाळू वाहतूक सुरू असली तरी मात्र या तस्करावर कोणतीही कार्यवाही होत नाही. उलट येथील तलाठी वाळू तस्करासोबत खुलेआम फिरत असल्याने कार्यवाही करणार कोण, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
लाखांदूर तालुक्याला चुलबंद नदी वरदान ठरलेली आहे. तर दुसरीकडे हिच नदी वाळू माफियासाठी व महसूल कर्मचाºयांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरल्याचे दिसून येत आहे. बोथली, मांढळ, खोलमारा, तावशी नदीघाटावर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. या घाटाचा अजुनपर्यंत लिलाव झाला नाही. त्यामुळे महसूल कर्मचाºयांना आर्थिक वंशीकरण करून वाळू माफिया या रेती घाटावर हल्ला चढवून रेतीची रात्रंदिवस ट्रॅक्टरद्वारे तस्करी करीत आहेत. याची सर्वस्वी माहिती महसूल कर्मचाºयांना असून दाम करी काम या उक्तीवर असल्याने कानाडोळा होत आहे.
या वाळू तस्करीच्या जुुगलबंदीत माफीये व महसूल कर्मचारी मालामाल होत असले तरी शासनाची तिजोरी मात्र खाली होत आहे. ज्याच्या खांद्यावर शासन संपत्तीची रक्षण करण्याची जबदारी सोपविण्यात शासनाने धन्यता मानली तेच महसूल कर्मचारी आर्थिक प्रलोभनाला बळी पडत असून माफियांना वाळू तस्करी करण्यास रान मोकळे करून देण्यात धन्यता मानीत आहेत. अशा कर्मचाºयांवर वरिष्ठांनी कार्यवाही करावी, अशीही जनसामान्यातून बोलले जात आहे.
वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित होताच त्या दिवसापुरते महसूल कर्मचारी जागे होतात. मात्र कार्यवाही शुन्य. संबंधित गावात असलेले तलाठ्यांना कोण शासन संपत्तीची चोरी करतो हे चांगले ठाऊक असते. मात्र प्रेमापोटी एक केस ट्रॅक्टर चालकांना मागणे व ती शासनास दाखविणे व बाकी माल डब्ब्यात भरणे असला प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
तावशी व चिचाळ येथील तलाठी मुख्यालयीन ठिकाणी वास्तव्यास राहत नसून १५ ते २० किमी अंतरावर राहतात. कुणी या चोरट्याची माहिती दिली तर मी बाहेर आहे. येतो एवढेच ऐकायला येत असल्याने व चोरट्यांना संंबंधित कर्मचारी वास्तव्यास नसल्याचे व हित संबंधीत असल्याने कार्यवाही होत नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष घालून मुरूम चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
 

Web Title: Illegal smuggling of sand from Bothali-Golmara-Tawashi Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर