माडगी घाटातून रेतीचा अवैध उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:33+5:30

माडगी (दे) येथील घाटाचा महसूल प्रशासनाने लिलाव केला नाही. चोरीने रेतीचा उपसा येथे सुरु आहे. रेती माफियांना कुणाचे अभय आहे याची चर्चा परिसरात आहे. अर्थकारणामुळे रेतीचा उपसा सुरु आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. हाकेच्या अंतरावर माडगी (दे) येथे तलाठी कार्यालय आहे. माडगी हे गाव तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे.

Illegal outburst of sand from Madgi Ghat | माडगी घाटातून रेतीचा अवैध उपसा

माडगी घाटातून रेतीचा अवैध उपसा

ठळक मुद्देचोरटी वाहतूक : महसूलचे दुर्लक्ष

न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील माडगी (दे) येथील वैनगंगा नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा राजरोसपणे सुरु आहे. शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. महसूल प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. तालुका मुख्यालयातून केवळ सात किमी अंतरावर रेतीचा हा गोरखधंदा सुरु आहे.
तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. माडगी (दे) येथे नदीपात्रातून राजरोसपणे नियमबाह्य रेतीचा उपसा सुरु आहे. नदीपात्रात ट्रॅक्टरने रेतीचा उपसा करण्यात येतो. गावाबाहेर रेतीची साठवणूक करून स्थानिकस्तरावर रेतीची विक्री सध्या सुरु आहे.
तुमसर मुख्यालयापासून सदर रेतीघाट केवळ सात किमी अंतरावर आहे. येथे नदीपात्र विस्तीर्ण असून पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहासोबत अल्प प्रमाणात रेती वाहून आली. त्या रेतीचा येथे उपसा करणे सुरु आहे. नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. रेती उपस्यामुळे नदीपात्र येथे पोखरलेले दिसते.
माडगी (दे) येथील घाटाचा महसूल प्रशासनाने लिलाव केला नाही. चोरीने रेतीचा उपसा येथे सुरु आहे. रेती माफियांना कुणाचे अभय आहे याची चर्चा परिसरात आहे. अर्थकारणामुळे रेतीचा उपसा सुरु आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. हाकेच्या अंतरावर माडगी (दे) येथे तलाठी कार्यालय आहे. माडगी हे गाव तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे.
रस्त्यावरून नदीपात्रात ट्रॅक्टर रेती वाहतूक करताना दिसतात. मात्र महसूल प्रशासनाला ते दिसत नाही. रेती चोरट्यांना महसूल प्रशासनाचे अभय दिसत आहे. रेती माफियांची टोळी संपूर्ण तुमसर तालुक्यात नदीपात्रातून सर्रास रेतीचा उपसा सुरु आहे. मागील पाच वर्षात संपूर्ण नदीपात्र पोखरून टाकण्यात आले, परंतु कारवाई शून्य होती. केवळ थातूरमातूर कारवाई येथे करण्यात आली. महसूल प्रशासन येथे दबावात आहे, अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे.

तस्करांवर कारवाई कधी?
तुमसर तालुक्यात विस्तीर्ण वैनगंगा, बावनथडी नद्यांचे पात्र आहे. नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. उपविभागीय अधिकारी कारवाई करणार काय? तुमसर येथे नव्याने उपविभागीय अधिकारी म्हणून नितीन सदगीर रूजू झाले आहेत. नियमानुसार कामे ते करतात अशी त्यांची ओळख आहे. ते तरुण असून ऊर्जावान आहेत. तुमसर व मोहाडी तालुका रेतीच्या चोरीपासून मुक्त करतात काय? हे आव्हान त्यांच्यासमोर आहे. नियम केवळ कागदावर न पाळता प्रत्यक्षात नियमानुसार कारवाई ते करतात काय? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Illegal outburst of sand from Madgi Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर