गडकुंभली टेकडीवर खनिजांचे अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:40 IST2018-07-18T23:40:13+5:302018-07-18T23:40:42+5:30
तालुका नैसर्गिक साधन सामुग्रीने नटलेला असून तालुक्यात पहाडी, झाडे, तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तस्करांच्या उपद्रवामुळे पहाड्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहेत.

गडकुंभली टेकडीवर खनिजांचे अवैध उत्खनन
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुका नैसर्गिक साधन सामुग्रीने नटलेला असून तालुक्यात पहाडी, झाडे, तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तस्करांच्या उपद्रवामुळे पहाड्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहेत. साकोलीपासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या गडकुंभली पहाडीवर दररोज अवैधरित्या मुरुम व गिट्टीचे राजरोसपणे उत्खनन सुरु आहे. मात्र याकडे वन व महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे.
वनविभाग व महसूल विभाग यांची संयुक्त अशी गडकुंभली येथे पहाडी आहे. या पहाडीवर महादेवाचे मंदिर असून पहाडीच्या पायथ्याजवळ गडकुंभली हे गाव वसले आहे. मात्र दोन्ही बाजूने दररज हजारो ब्रास मुरुम व गिट्टीचे दररोज अवैधरित्या खनन होत आहे. यामुळे गावाला व पहाडीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अवैध खननाची चौकशी करून ज्या अधिकाºयांनी या अवैध खननाकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आहे.