मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:45+5:302021-07-08T04:23:45+5:30

०७ लोक ०२ के अडयाळ : येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील शिवाजी चौकात एका सार्वजनिक विहिरीत अचानकपणे ग्रामस्थांना दुर्गंधीयुक्त ...

Ignoring basic problem solving | मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष

मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष

०७ लोक ०२ के

अडयाळ :

येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील शिवाजी चौकात एका सार्वजनिक विहिरीत अचानकपणे ग्रामस्थांना दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्याची समस्या आढळली. ग्रामपंचायत तथा वॉर्ड सदस्यांना याची माहिती आठ दिवस आधी देऊनही ग्रामपंचायत अडयाळने ना त्या विहिरीचे पाणी उपसा केले ना त्यावर तत्काळ उपाययोजना आखली यामुळे येथील परिसरात आरोग्याचा ही प्रश्न निर्माण होऊ शकते, असे असले तरी ग्रामपंचायत एव्हढी बेजबाबदार कशी? हाच ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे. यावेळी नितीन वरगंटीवार, गीता फटिक, रागिणी पोटवार, उषा बोरूले, सरूताई बोरूले ग्रामस्थांनी एक नाही तर वारंवार येथील बिकट समस्या ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्यांना सांगितली. पण समस्या सुटलेली नाही. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढल्यावर समस्या सोडवायची काय, असा सवालही उपस्थित केला आहे. गावातील ही एकच समस्या नाही. गावात सार्वजनिक मुतारीघर असून तेही स्वच्छ राहत नाही. ग्रामस्थांनी सांगितलेल्या समस्येवर ग्रामपंचायत पदाधिकारी विचार करतात, पण कारवाई होत नाही, हीच मुख्य अडचण आहे.

Web Title: Ignoring basic problem solving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.