चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : स्थानिक जिल्हा परिषद गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. गत दीड वर्षापासून जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम थांबले आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.जिल्हा परिषद गांधी विद्यालयात इयत्ता ५ ते १२ पर्यंत १,२०० विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्याकरिता बांधकाम विभागाने एक कोटी रुपये इमारतीकरिता मंजूर केले आहे. तसेच रंगरंगोटी, पॅरापीट वॉल, विद्युतीकरण यासाठी १८ लक्ष रुपये मंजूर झाले असताना कामाचे प्रशासकीय आदेश देण्यास बांधकाम विभाग टाळाटाळ करीत आहेत.गांधी विद्यालयाच्या इमारतीचे कंत्राट वेदांत कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. इमारत उभी झाली. परंतु इतर कामे अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी इमारत गैरसोयीचे आहे.जुनी इमारत निकृष्ट असून स्लॅबचे 'पोपडे' खाली पडतात. इमारत धोकादायक आहे. पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांनी गळक्या इमारतीत ज्ञानार्जन केले आहे. फेब्रुवारी २०१९ पासून शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० व १२ च्या परीक्षा सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था अपुरी ठरणार असल्याने नवीन इमारती पूर्ण होणे आवश्यक आहे.
शाळा इमारतींकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:56 IST
स्थानिक जिल्हा परिषद गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. गत दीड वर्षापासून जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम थांबले आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
शाळा इमारतींकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
ठळक मुद्देविद्यार्थ्यांची कुचंबणा : लाखनीच्या गांधी विद्यालयाची अपूर्ण इमारत