पऱ्हे कमी असल्यास ड्रम सिडरने पेरणी करा

By Admin | Updated: August 1, 2014 00:09 IST2014-08-01T00:09:48+5:302014-08-01T00:09:48+5:30

यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाला. मध्यंतरी पाण्याचा ताण पडून बऱ्याच शेतकऱ्यांचे पऱ्हे मेलेत. काही ठिकाणी रोपांचे वय वाढले. बऱ्याच शेतकऱ्यांची रोपे खराब झालीत. अशावेळी ज्यांचेकडे चांगली रोपे

If it is low, then drill with sidder | पऱ्हे कमी असल्यास ड्रम सिडरने पेरणी करा

पऱ्हे कमी असल्यास ड्रम सिडरने पेरणी करा

भंडारा : यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाला. मध्यंतरी पाण्याचा ताण पडून बऱ्याच शेतकऱ्यांचे पऱ्हे मेलेत. काही ठिकाणी रोपांचे वय वाढले. बऱ्याच शेतकऱ्यांची रोपे खराब झालीत. अशावेळी ज्यांचेकडे चांगली रोपे उपलब्ध नाहीत अशा शेतकऱ्यांनी ड्राम सिडरचा वापर करून चिखलणी केलेल्या शेतात पेरणी करावी असे आवाहन कृषि विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
ड्रम सिडरने पेरणी करताना मुख्य शेतात चिखलणी करून फन फिरवावी, सेंद्रीय व रासायनिक खतांचा हप्ता चिखलात मिसळून घ्यावा. त्यानंतर हलके किंवा मध्यम कालावधीचे धानाचे वाण निवडून बिज प्रक्रिया करावी. हलके पोचट बी जाळून घ्यावे. चांगले सशक्त बियाणे घेऊन २४ तास पाण्यात भिजवावे. त्यानंतर २४ तास तणसात दाबून ठेवावे व नंतर किंचित बारीक अंकुर आलेले बियाणे ड्रामसिडरचे मदतीने पेरणी करावे. ड्रम सिडर कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे उपलब्ध आहे. यामुळे दोन ओळीतील अंतर २० से.मी. राखले जाऊन विशिष्ट अंतरावर बियाणे पेरणी केली जाते. ६० ते ७५ किलो बियाणे हेक्टर पेरता येते. ओळीत असल्यामुळे डवरण, निंदण करता येते. पिक ८-१० दिवस लवकर तयार होते. मजूर खर्चात बचत होते. योग्य व्यवस्थापन केल्यास लावणी पद्धतीप्रमाणे उत्पादन मिळते. ज्या शेतकऱ्यांना या पद्धतीने पेरणी करायची असेल त्यांनी कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे संपर्क करावा. टोल फ्री क्रमांक १८००२३३५९४६ आहे. यंत्र वापर करीता कृषी विज्ञान केंद्राकडून उपलब्ध करण्यात येईल. तरी शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: If it is low, then drill with sidder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.